esakal | आयपीएल भारताची, कमाई केली अमिरातीने
sakal

बोलून बातमी शोधा

Emirates Cricket Board

आयपीएल भारताची, कमाई केली अमिरातीने

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटात क्रिकेटविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय लीग आयपीएल बीसीसीआयने गतवर्षी अमिरातीत यशस्वीपणे खेळवली; परंतु प्रतिष्ठा जपताना खिशालाही कात्री लागली. या स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआयने अमिराती क्रिकेट मंडळाला ९८.५ कोटी रुपये दिले. अमिराती क्रिकेट मंडळाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लोकप्रिय लीग भारताची, कमाई केली अमिरातीने, असा फुकटचा फायदा अमिराती मंडळाचा होत असताना बीसीसीआयचा खिसा केवळ ९८.५ कोटींनीच रिकामा झाला नाही, तर खेळाडू आणि संबंधितांच्या कोरोना चाचणीसाठी ९.४९ कोटी आणि आणखी ३ कोटी जैवसुरक्षा वातावरण तयार करण्यासाठी खर्च करण्यात आले.

स्पोर्ट्स जगतातील अन्य बातम्यांसाठी येथे क्लिक करा

भारतात आयपीएलचे सामने होत असताना होम फ्रँचाईस स्थानिक राज्य क्रिकेट संघटनेला आयोजन खर्च देत असतात; परंतु अमिराती क्रिकेट मंडळाला दिलेला हा निधी त्याच्या दुप्पट असल्याची माहिती पुढे येत आहे. आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान जवळपास २० हजार चाचण्या करण्यात आल्या होत्या.

सेहवागनं Meme पोस्ट करत प्रिती झिंटाला केलं ट्रोल

गत स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही अमिराती क्रिकेट मंडळाला ९८.५ कोटी दिले. ही रक्कम भारतातील आयोजनाच्या दुप्पट आहे; परंतु प्रत्येक देशाची आर्थिक रचना वेगळी असते. खरे तर गतवर्षी आयपीएल होणे कठीण होते; परंतु अमिरातीने आम्हाला सहकार्य केले तेही मोलाचे होते, असे मत बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. २०१९ मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये सामने आयोजित केल्याचे प्रत्येक राज्य संघटनेला ५० लाख मिळाले होते. केवळ पुरुषांच्या आयपीएल आयोजनासाठीच नव्हे, तर प्लेऑफच्या काळात झालेल्या महिलांच्या चॅलेंजर्स स्पर्धेसाठीही बीसीसीआयने २.५२ कोटींपेक्षा अधिक रक्कम दिली.