esakal | BCCI अध्यक्ष सौरव गांगुलींची तब्येतीबाबत अपोलो हॉस्पिटलचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

bcci president sourav ganguly once again admitted hospital

बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलींची तब्येतीबाबत अपोलो हॉस्पिटलचा खुलासा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. सौरव गांगुली यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नुकतीच त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर आज अचानक छातीत दुखायला लागल्यानं कोलकात्यातील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

याआधी गांगुलींना 2 जानेवारी रोजी छातीत दुखायला लागल्यानंतर कोलकात्यातील वुडलँड्स रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथं सौरव गांगुली यांची अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली होती. गेल्यावेळी ते घरात जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्रास जाणवू लागला होता. दरम्यान, सौरभ गांगुली, यांनी शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलला चेकअपसाठी भेट दिली होती. त्यांच्या प्रकृतीतमध्ये शस्त्रक्रियेनंतर कोणताही बदल झालेला नाही. त्यांनी प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती अपोलो हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.

पाच दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर गांगुली घरी परतले होते. तेव्हा सौरव गांगुली यांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर स्टाफचे आभारही मानले होते. ते म्हणाले होते की, आता मी पूर्णपणे बरा आहे. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार. रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर गांगुलींना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. 

loading image
go to top