BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने विराट कोहलीबद्दल केलं मोठ विधान

खराब फॉर्म मधून जात असलेल्या कोहलीला टीकेचा सामना करावा लागत आहे
bcci president Sourav Ganguly Statement on Virat Kohli
bcci president Sourav Ganguly Statement on Virat Kohlisakal

Sourav Ganguly Statement on Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या वाईट टप्प्यातून जात आहे. कोहलीच्या बॅटने जवळपास गेल्या अडीच वर्षापासून शतक ठोकले नाही. इंग्लंड दौऱ्यावरही विराट कोहली आतापर्यंत अपयशी ठरला आहे. कसोटी आणि टी-20 मालिकेतील दोन्ही डावात कोहली फ्लॉप ठरला आहे. खराब फॉर्म मधून जात असलेल्या कोहलीला टीकेचा सामना करावा लागत आहे. काही त्याला विश्रांतीचा सल्ला देत आहेत तर काही त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास सांगत आहेत. या सगळ्यात विराट कोहलीला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचा पाठिंबा मिळाला आहे.

विराट कोहली सर्व अपयशानंतरही बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. एएनआयशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराट कोहलीचे आकडे बघा... होय, त्याच्यावर कठीण वेळ आली आहे आणि त्याला हे माहित आहे. तो स्वतः एक महान खेळाडू आहे. हे त्याला माहीत आहे. मला वाटते की तो लवकरच फॉर्ममध्ये येईल आणि चांगली फलंदाजी करेल.

कोहलीला मार्ग शोधावा लागेल आणि यशस्वी व्हावे लागेल, जो तो गेल्या 12-13 वर्षांपासून करत आहे. मला खात्री आहे की कोहली ते साध्य करेल. अनेक माजी खेळाडूंनी विराट कोहलीला आता संघातून डच्चू देण्यात यावा अशी मागणी केली आहे. कपिल देव यांनी देखील विराटचे स्टारपण न पाहता त्याला आता बेंचवर बसवून नव्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना संधी द्यावी असे परखड मत व्यक्त केले होते.

bcci president Sourav Ganguly Statement on Virat Kohli
ब्रिटनच्या संसदेकडून BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलींचा गौरव

इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने 10 विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 14 जुलैला मँचेस्टरमध्ये होत आहे. मात्र याही वनडे सामन्याला भारताचा माजी कर्णधार विराट कोहली मुकण्याची शक्यता आहे. त्याचा मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे विराट कोहली इंग्लंड विरूद्धची पहली वनडे खेळला नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com