
'BCCI चा खरा कंट्रोल भाजपकडेच' PCB च्या माजी चेअरमनचा दावा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबाबत (BCCI) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी मोठा दावा केला आहे. पीसीबीचे माजी अध्यक्ष म्हणतात बीसीसीआयवर भाजप सरकारचा कंट्रोल आहे. यामुळेच पाकिस्तान आणि भारत यांच्यात क्रिकेटबद्दल बोलता येत नाही. एहसान मनी यांनी काही दिवसानपूर्वीच पीसीबीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.(BCCI Run By BJP Government Claim Former PCB Chairman Ehsan Mani)
हेही वाचा: 'मैं तो रस्ते से जा रहा था' गोविंदाच्या गाण्यावर पंजाबचा संघ थिरकला- VIDEO
क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीत एहसान मनी म्हणतात की बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आहे. त्यांच्या बोर्डाचा सचिव कोण आहे, असा प्रश्न कधी कुणाला प्रश्न पडला आहे का ? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शाह आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ भाजपच्या एका मंत्र्याचा भाऊ आहे. त्याच्याकडे खरे बीसीसीआयचे नियंत्रण आहे. म्हणून मी सौरव गांगुलीशी तडजोड केली नाही.
हेही वाचा: ड्रग्ज गांजा गॅंगमध्ये वाढला, एक वेळची भाकरी खाऊन बनला घातक बॅट्समन
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची मालिका २०१२ मध्ये खेळल्या गेली होती. त्यानंतर परत कधी पाकिस्तानचा संघ भारतच्या दौऱ्यावर आला. तेव्हापासून दोन्ही देशांतील राजकीय संबंधांमध्ये चढ-उतार येत राहिले. जरी दोन्ही संघ आयसीसी स्पर्धांमध्ये अनेक वेळा सहभागी झाले आहेत आणि एकमेकांच्या विरोधात आले आहेत. पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा हेही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटबद्दल सतत बोलत होते. अलीकडेच रमीझ राजाने आयसीसीला एक प्रस्ताव दिला होता, ज्यामध्ये भारत-पाकिस्तान-इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया टी-20 स्पर्धा आयोजित करावा, असे म्हटले होते. मात्र आयसीसीने हा प्रस्ताव फेटाळला होता.
Web Title: Bcci Run By Bjp Government Claim Former Pcb Chairman Ehsan Mani Sourav Ganguly
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..