Team India : चेतन शर्मांच्या निवड समितीला BCCIने बनवला बळीचा बकरा ?

विश्वचषकातील खराब कामगिरी पाहता निवड समितीला बळीचा बकरा बनवण्यात आला आहे का?
Team India
Team Indiasakal

Team India : टी-20 विश्वचषक-2022 मध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि संघ उपांत्य फेरीपर्यंत जाऊ शकला नाही. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अनेक बदल करण्याच्या मूडमध्ये असल्याचे संकेत दिले आहेत. बोर्डाने संपूर्ण वरिष्ठ निवड समिती बरखास्त केल्याने याला पुष्टी मिळाली आहे. बोर्डाने शुक्रवारी नवीन निवड समितीसाठी अर्ज काढला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर प्रश्न उपस्थित होत आहे की विश्वचषकातील खराब कामगिरी पाहता निवड समितीला बळीचा बकरा बनवण्यात आला आहे का.?

Team India
Fifa World Cup : झिदानची ढुशी ते मॅराडोनाचा Hand of God, वाचा वर्ल्डकप मधले वादग्रस्त प्रसंग

चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील समितीकडे फारसा वेळ नव्हता. मात्र, या समितीने दोन टी-20 विश्वचषकांसाठी संघांची निवड केली होती, दोन्ही विश्वचषकांमध्ये भारताची निराशा झाली होती. गेल्या विश्वचषकात तसेच या विश्वचषकात संघ निवडीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र संघाच्या खराब कामगिरीसाठी केवळ निवड समितीला दोष देणे योग्य नाही. यादरम्यान संघ निवडीतही अनेक विसंगती दिसून आल्या. भारताने गेल्या वर्षभरात सात कर्णधारांना आजमावले आहे. टीम इंडियामध्ये अनेक खेळाडूंना संधी मिळाली, पण काही खास कामगिरी करता आली नाही.

Team India
Fifa World Cup : झिदानची ढुशी ते मॅराडोनाचा Hand of God, वाचा वर्ल्डकप मधले वादग्रस्त प्रसंग

संघाचे अपयश हे केवळ एका कारणामुळे नाही तर यामागे अनेक कारणे आहेत. निवड समितीच्या निर्णयापासून कर्णधार आणि प्रशिक्षकाने मैदानावर घेतलेले निर्णय. या विश्वचषकात संघाकडे युझवेंद्र चहलसारखा महान फिरकी गोलंदाज होता जो मधल्या षटकांमध्ये संघाला विकेट मिळवून देऊ शकला होता पण कर्णधार आणि प्रशिक्षक दोघांनीही त्याला खेळायला दिले नाही. पंत आणि दिनेश कार्तिक यांच्याबाबत संघ गोंधळलेला दिसत होता. असे अनेक निर्णय होते ज्यावरून कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी खेळाडूंचा योग्य वापर केला नसल्याचे दिसून येते आली.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com