Cricket News : वर्ल्डकपमधील परभवानंतर BCCI चा दे धक्का! सर्वच सलेक्टर्सची केली हकालपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI sacks Chetan Sharma-led senior national selection committee cricket Update

Cricket News : वर्ल्डकपमधील परभवानंतर BCCI चा दे धक्का! सर्वच सलेक्टर्सची केली हकालपट्टी

BCCI fired Selectors : टी २० विश्वचषकादरम्यान इंग्लडविरोधात सेमीफायनलमध्ये भारतीय क्रिकेट संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान यानंतर बीसीसीआयने चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील संपूर्ण निवड समितीला काढून टाकले आहे.

T20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने ही कारवाई केली आहे. बीसीसीआयने निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. इतकेच नाही तर बीसीसीआयने या रिक्त पदांसाठी नवीन अर्जही मागवले आहेत.

हेही वाचा: MNS Vs Rahul Gandhi: मनसे शेगावात दाखल, पण कचोरीवर सेटलमेंटची शक्यता; ट्विटरवर Memes Viral

विश्वचषकातील पराभवाचे परिणाम

चेतन शर्मा आणि त्याच्या संपूर्ण टीमला काढून टाकण्याचे थेट कारण म्हणजे गेल्या दोन विश्वचषकातील टीम इंडियाचा पराभव. दोन्ही टूर्नामेंटच्या पराभवानंतर खेळाडूंच्या निवडीवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते, त्यामुळे बीसीसीआयने चेतन आणि त्याच्या संपूर्ण टीमला काढून टाकले आहे.

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

हेही वाचा: Shraddha Walkar Murder: आफताबवर 'थर्ड डिग्री' वापरू नका, दिल्ली कोर्टाचे पोलिसांना निर्देश

भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू न शकल्याने कठोर निर्णय घेत, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय राष्ट्रीय निवड समितीची हकालपट्टी केली. चेतन शर्मा यांच्या कार्यकाळात भारतीय संघ 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकाच्या बाद फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. याशिवाय जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही संघाचा पराभव झाला. चेतन शर्मा (उत्तर विभाग), हरविंदर सिंग (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबाशीष मोहंती (पूर्व विभाग) यांचा राष्ट्रीय निवडकर्ता म्हणून कार्यकाळ खूप कमी राहीला.

यापैकी काहींची 2020 मध्ये तर काहींची 2021 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. वरिष्ठ राष्ट्रीय निवडकर्त्याचा कार्यकाळ हा सहसा चार वर्षांचा असतो आणि तो पुढे वाढवला जाऊ शकतो. अभय कुरुविला यांचा कार्यकाळ संपल्याने पश्चिम विभागातून निवडकर्ता नव्हता. बीसीसीआयने शुक्रवारी राष्ट्रीय निवडकर्त्यांसाठी (वरिष्ठ पुरुष) अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर आहे.