Jay Shah : ICC च्या आर्थिक नाड्या जय शाहांच्या हातात; मिळाली मोठी पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI secretary Jay Shah to head finance and commercial

Jay Shah : ICC च्या आर्थिक नाड्या जय शाहांच्या हातात; मिळाली मोठी पोस्ट

Jay Shah : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांची ही सलग दुसरी टर्म असणार आहे. बार्कले व्यतिरिक्त BCCI चे सचिव जय शाह यांची बोर्डाच्या बैठकीत आयसीसीच्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. झिम्बाब्वेच्या मुकुहलानी यांनी माघार घेतल्याने बार्कले यांची बिनविरोध निवड झाली. आयसीसी बोर्डाने बार्कलेला पूर्ण पाठिंबा दिला.

हेही वाचा : हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

बार्कले यांना नोव्हेंबर 2020 मध्ये आयसीसीचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. ते यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेटचे अध्यक्ष आणि 2015 मध्ये आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकाचे संचालक होते. आयसीसीच्या सर्वात महत्त्वाच्या समितीच्या पदाची जबाबदारी शाह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जय शाहा यांना सर्व प्रमुख आर्थिक धोरण निर्णय घेते ज्यांना नंतर ICC बोर्डाने मान्यता दिली आहे.

हेही वाचा: Babar Azam : पाक पीएमच्या भारताविरूद्ध केलेल्या 'खोडसाळ' ट्विटवर आलं बाबर आझमचं वक्तव्य

आयसीसीच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “प्रत्येक सदस्याने जय शाह यांना वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे प्रमुख म्हणून स्वीकारले आहे. आयसीसी अध्यक्षांव्यतिरिक्त ही एक तितकीच शक्तिशाली उपसमिती आहे. वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे अध्यक्ष नेहमीच आयसीसी बोर्ड सदस्य असतात आणि शाह यांच्या निवडीवरून हे स्पष्ट होते की ते आयसीसी बोर्डावर बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणार आहे.