esakal | काश्मीर प्रीमीयर लीग वाद; BCCI चं गिब्जसह PCB ला प्रत्युत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Jay Shah And Herschelle Gibbs

काश्मीर प्रीमीयर लीग वाद; BCCI चं गिब्जसह PCB ला प्रत्युत्तर

sakal_logo
By
सुशांत जाधव

काश्मीर प्रीमीयर लीगच्या मुद्यावरुन (Kashmir Premier League) मुद्द्यावरून बीसीसीआयने (BCCI) पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हर्षल गिब्जला चपराक लगावलीये. देशातील क्रिकेट यंत्रणेसंदर्भात कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत, असे भारतीय क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. प्रीमियर लीगमध्ये न खेळण्याबाबत आपल्यावर बीसीसीआयकडून दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोप हर्षल गिब्जने केला आहे यावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने प्रतिउत्तर दिले आहे. (BCCI Slammed Former Cricketer Herschelle Gibbs And Pakistan Cricket Board on Kashmir League issue)

'मॅच फिक्सिंगप्रकरणी सीबीआयच्या चौकशीला सामोरे गेलेला खेळाडूच्या आरोपात किती तथ्य आहे हे सांगू शकत नाही. पण जरी त्याचे आरोप खरे असले तरी देशातील क्रिकेट स्पर्धेसंदर्भातील अधिकार हे बीसीसीआयकडे आहेत. हर्षल गिब्ज आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही गोष्ट लक्षात ठेवावी, असा इशारा बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिला आहे.

हेही वाचा: चक दे इंडिया! हॉकीत'राणी'च्या संघाला मिळाली 'महाराणी'ची साथ

काश्मीर लीगच्या मुदयावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड विनाकारण नाक खुपसत आहे. हा बीसीसीआयचा अंतर्गत मुद्दा असून पाकिस्तानने आयसीसीकडे धाव घेतली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, असा टोलाही बीसीसीआय अधिकाऱ्याने लगावला.

हर्षल गिब्जनं नेमका कोणता आरोप केलाय?

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हर्षल गिब्जने धक्कादायक आरोप केलाय. तो म्हणाला होता की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी काश्मीर लीगमध्ये खेळण्यावरुन धमकी दिलीये. जर काश्मीर लीगमध्ये सहभागी झालो तर भारतातील कोणत्याही क्रिकेटमध्ये सक्रीय होऊ देणार नाही, असे धमकावण्यात आले आहे. ग्रॅहम स्मिथच्या माध्यमातून यासंदर्भात सूचना देण्यात आल्याचे गिब्जने म्हटले होते. गिब्जने भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध जोडत बीसीसीआयची ही भूमिका अयोग्य असल्याचटे ट्विटही केले होते.

हेही वाचा: Olympics : डेटिंग अन् प्रेमाची सेटिंग; पाहा ऑलिम्पियन कपल

ऑगस्ट महिन्यांपासून काश्मीर प्रीमियर लीग स्पर्धा नियोजित आहे. या स्पर्धेत हर्षल गिब्जसह तिलकरत्ने दिलशान, मॉन्टी पानेसर यासारखे दिग्गज खेळाजू सहभागी होणार आहेत. या लीगमध्ये ओवरसीज वॉरियर्स, मुजफ्फराबाद टायगर्स, रावळकोट हॉक्स, बाग स्टालियन, मीरपूर रॉयल्स आणि कोटली लायन्स असे सहा संघ सहभागी असतील.

loading image
go to top