जागतिक फेन्सिंगमध्ये भवानीचे ऐतिहासिक यश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

जागतिक फेन्सिंग स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठणारी पहिली भारतीय होण्याचा मान भवानी देवीने मिळवला. तिला पराजित केलेल्या 
रुमानियाच्या बिआंको पास्कू हीने ब्रॉंझ पदक जिंकले. 

मुंबई : जागतिक फेन्सिंग स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठणारी पहिली भारतीय होण्याचा मान भवानी देवीने मिळवला. तिला पराजित केलेल्या 
रुमानियाच्या बिआंको पास्कू हीने ब्रॉंझ पदक जिंकले. 

बुडापेस्टला झालेल्या या स्पर्धेत भवानीने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रभावी कामगिरी केली. ती सुरुवातीस 6-13 अशी मागे होते, पण तिने कडवा प्रतिकार करीत 14-14 अशी बरोबरी साधली. मात्र अखेर तिला 14-15 अशा पराभवास सामोरे जावे लागले. 

या स्पर्धेतील अनुभवाचा मला नक्कीच फायदा होईल. ऑलिंपिक पात्रतेच्या वर्षातील हे यश मोलाचे आहे. कठोर सराव आणि जिद्द यामुळे प्रगती होत आहे. आता अजून कसून सराव करणार आहे, असे भवानीने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhavani creates a history by winning in world fencing championships 2019