esakal | VIDEO : खासदार प्रज्ञा ठाकुरांचा महिला खेळाडूंसोबत 'कबड्डीचा डाव' I Pragya Singh Thakur
sakal

बोलून बातमी शोधा

Pragyasingh Thakur
भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर एका नव्या रुपात समोर आल्या आहेत.

VIDEO : खासदार प्रज्ञा ठाकुरांचा महिला खेळाडूंसोबत 'कबड्डीचा डाव'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

भोपाळ (मध्य प्रदेश) : भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर (Pragyasingh Thakur) एका नव्या रुपात समोर आल्या आहेत. त्यांचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरला झाला असून त्यात त्या कबड्डी (Kabaddi) खेळताना दिसत आहेत. प्रज्ञा ठाकूर या शक्तीनगर परिसरात देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. प्रार्थना केल्यानंतर, प्रज्ञा ठाकूर यांनी मैदानातील कबड्डी खेळाडू आणि मैदानावर उपस्थित प्रशिक्षकाला मंचावर बोलावले. त्यानंतर त्यांनी क्रीडापटूंचा सन्मान केला.

यावेळी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना खेळाडूंनी कबड्डी खेळण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन महिला खेळाडूंबरोबर काही क्षण कबड्डी खेळण्याचा आनंद त्यांनी लुटला. हा त्यांचा खेळाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यापूर्वी जुलै महिन्यात त्या शक्तीनगरमध्येच बास्केटबॉल खेळताना दिसल्या होत्या. शक्तीनगरच्या बास्केटबॉल मैदानावर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या कार्यक्रमात प्रज्ञा ठाकूर सहभागी झाल्या होत्या. तिथे त्यांनी बास्केटबॉल खेळण्याचा आनंद लुटला होता.

हेही वाचा: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दारु पिऊन 10 टक्के लाच घेतात

दरम्यान, खेळाडू मैदानावर सराव करत होते. खेळाडूंना खेळताना पाहून त्या स्वत: ला रोखू शकल्या नव्हत्या आणि त्यांच्यात जावून त्या खेळाचा आनंद घेतला होता. भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. या आजारांमुळे त्यांना चालताना अडचण निर्माण होते, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्या व्हिल चेअरचा आधार घेत आहेत.

हेही वाचा: मी चालत फिरीन नाहीतर लोळत फिरीन, तुम्हाला त्याचं काय?

loading image
go to top