उमरानने नव्हे तर भुवनेश्वरने मोडले शोएबचे वर्ल्ड रेकॉर्ड? | Bhuvneshwar Kumar Bowl 208 KPH | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhuvneshwar Kumar bowl 208 kph delivery against ireland  shoaib akhtar world

उमरानने नव्हे तर भुवनेश्वरने मोडले शोएबचे वर्ल्ड रेकॉर्ड?

Bhuvneshwar Kumar : भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिल्या टी-20 मध्ये खूप खास दृश्य पाहायला मिळाले. ज्याने हे पाहिले त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या नावावर आहे. 2003 च्या विश्वचषकात या गोलंदाजाने इंग्लंडविरुद्ध 161.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. आता भुवनेश्वर कुमारने सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे.

उमरान मलिकने सर्वात वेगवान चेंडू टाकला असता तर विश्वास बसला असता. पण आता भुवनेश्वर कुमारही सर्वात वेगवान चेंडू टाकू शकतो, असे कोणी म्हटले तर त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यामध्ये भुवनेश्वर कुमारच्या चेंडूचा वेग ताशी 208 किमी मोजला गेला आहे. जगातील सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम करणाऱ्या शोएब अख्तरने पण एवढा वेगवान चेंडूही फेकला नव्हता. तो देखील 170 किमी प्रतितासच्या वेगाच्या पुढे गेला नाही. भुवनेश्वरच्या या वेगवान चेंडूमागे स्पीडोमीटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.(Bhuvneshwar Kumar bowl 208 kph delivery against ireland shoaib akhtar world)

भुवनेश्वर कुमारने डावाच्या पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू 201 किमी प्रति तास तर तिसरा चेंडू 208 किमी प्रति तास वेगाने टाकला होता. टीव्हीवर स्पीडोमीटरने दाखवलेले हे दृश्य पाहून सगळेच हैराण झाले. तांत्रिक बिघाडामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली. उमरान मलिकचा वेग पाहण्यासाठी चाहते आले होते, मात्र भुवनेश्वर कुमारने त्यांना चकित केले. चाहत्यांनी अनेक मजेदार असे मीम्स शेअर केले आहेत. भुवनेश्वर कुमारने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याने 3 षटकात 16 धावा देत 1 बळी घेतला. भुवीने एक ओव्हर मेडनही टाकला.

Web Title: Bhuvneshwar Kumar Bowl 208 Kph Delivery Against Ireland Shoaib Akhtar World Record Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..