बीग बॅश लीगने स्वतःचे आयपीएल होऊ दिले नाही | Big Bash League Brisbane Heat vs Sydney Sixers Match Re schedule | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Bash League
बीग बॅश लीगने स्वतःचे आयपीएल होऊ दिले नाही

BBL : बीग बॅश लीगने स्वतःचे आयपीएल होऊ दिले नाही

बीग बॅश लीग ही आंतरराष्ट्रीय दर्जाची टी 20 लीग म्हणून ओळखली जाते. मात्र बीग बॅश लीगला (Big Bash League) कोरोनाचे (Corona) ग्रहण लागले आणि स्पर्धा स्थगित करण्याची वेळ येते का अशी भीती वाटू लागली होती. मात्र आयोजकांनी शक्कल लढवत बीग बॅश लीगची आयपीएल (IPL) होऊ दिली नाही. आयपीएलच्या गेल्या हंगामात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती.

मात्र बीग बॅश लीगमध्ये (Big Bash League) कोरोनाचा शिरकाव होऊनही त्यांनी स्पर्धा स्थगित करण्याऐवजी एक वेगळीच शक्कल लढवली. बीबीएलमध्ये ब्रिसबेन हीट (Brisbane Heat) आणि सिडनी सिक्सर (Sydney Sixers) यांच्यात सामना होणार होता. मात्र ब्रिसबेन हीट संघातील अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने सामना रद्द करावा लागतो का अशी शंका उपस्थित झाली होती. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) आजच्या सामन्यातील संघच बदलला. आज कोरोनाग्रस्त ब्रिसबेन हीट ऐवजी पर्थ स्कॉचर सिडनी सिक्सर बरोबर भिडणार आहे.

हेही वाचा: मोहम्मद हाफीज निवृत्तीनंतर लगेच वाकड्यात शिरला

फॉक्स क्रिकेटने दिलेल्या वृत्तानुसार पर्थ स्कॉचरचा (Perth Scorchers) संघ आधीपासूनच गोल्ड कोस्टमध्ये उपस्थित आहे. त्यामुळे आता ते सिडनी सिक्सर बरोबर मेट्रिकोन स्टेडियमवर भिडणार आहेत. ब्रिसबेन हीट आणि सिडनी सिक्सर हे दोघेही एकाच हॉटलेमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांचा लोकांशी संपर्क आला होता.

ब्रिसबेन संघ रविवारी एका सार्वजनिक विमानाने क्वीन्सलँडमध्ये दाखल झाला होता. ते कॅनबेरावरुन होबर्ट आणि नंतर गोल्ड कोस्टला आले होते. त्यावेळी कोणाचीही कोरोना पीसीआर (PCR Test) चाचणी पॉझिटिव्ह आली नसली तरी ब्रिसबेन हीट संघातील काही खेळाडूंची रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

हेही वाचा: पोरीनं नाद केला, पण वाया नाही गेला!

त्यामुळे संघाने पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचणी केली अजून त्याचा अहवाल अजून आला नाही. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सामना रद्द न करता सामन्यातील एक संघ बदलला. सिडनी थंडर (Sydney Thunder) आणि पर्थ स्कॉचर यांच्यातील सामना आज ( दि. 4 जानेवारी ) होणार होता. आता हा सामना गुरुवारी रात्री होणार आहे. आज सिडनी सिक्सर आणि पर्थ स्कॉचर यांच्यात सामना होईल.

ब्रिसबेन हीटचा (Brisbane Heat) पुढचा सामना हा रेनेगेड्स (Renegades) यांच्याबरोबर ६ जानेवारीला होणार आहे. जर ब्रिसबेन हीटच्या खेळाडूंची पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) या सामन्याबाबत काय निर्णय घेणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crickett20 league
loading image
go to top