MCA : एमसीए निवडणुकीची प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MCA

MCA : एमसीए निवडणुकीची प्रक्रिया सुरू

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) बहुचर्चित निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून १६ जागांसाठी होणारी ही निवडणूक २० ऑक्टोबर रोजी होत आहे.

बीसीसीआयच्या नव्या घटनेनुसार होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. त्यानुसार उद्यापासून ३ ऑक्टोबरपर्यंत एमसीएशी संलग्न असलेल्या क्लबनी आपल्या प्रतिनिधींची नावे कळवायची आहेत. त्यानंतर पुढच्या दिवशी म्हणजे ४ ऑक्टोबरला मतदान करणारे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू यांची नावे निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येतील.

पाच पदाधिकारी, नऊ अपेक्स कौन्सिल सदस्य आणि मुंबई ट्वेन्टी-२० लीगसाठी दोन प्रतिनिधी अशा १६ जागांसाठी ही निवडणूक असेल. त्यासाठी ६ ते १० ऑक्टोबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे. ११ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. १४ तारखेला सायंकाळी ५ पर्यंत अर्ज मागे घेता येतील, त्यानंतर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

२० तारखेला दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होईल आणि त्यानंतर निकाल जाहीर केले जातील. यंदा प्रथमच शरद पवार गट तयार करण्यात आला असून त्यांचे उमेदवार निश्चित केले जात आहेत. बाळ महाडदळकर गटही आपली तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे.