IND vs AUS 1st Test इशान किशनवर राहुल द्रविडने मारली फुली? अशी असेल पहिल्या कसोटीची Playing 11

IND vs AUS 1st Test Playing 11
IND vs AUS 1st Test Playing 11 esakal

IND vs AUS 1st Test Playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा नागपूर येथून नारळ फुटणार आहे. भारतीय संघ नागपूरमध्ये दाखल झाली असून ऑस्ट्रेलियाचा संघ देखील भारतात दाखल झाला आहे. बॉर्डर - गावसकर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीदरम्यान नागपुरात होणार आहे. WTC Final मध्ये पोहचण्यासाठी ही मालिका महत्वाची आहे.

IND vs AUS 1st Test Playing 11
Joginder Sharma Retirement : 2007 चा T20 विश्वचषक गाजवणाऱ्या जोगिंदरकडून निवृत्तीची घोषणा

त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग 11 कशी असेल याचबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात रोहित, विराट आणि चेतेश्वर हे वरिष्ठ खेळाडू परतणार आहेत. केएल राहुल देखील लग्नानंतर टीम इंडियात दाखल होत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी 20 मालिकेत भारताचा विकेटकिपर इशान किशन याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला या मालिकेत चांगली कामगिरी करून ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत कसोटी संघात त्याची जागा घेण्याची संधी होती. मात्र ही संधी त्याने वाया घालवली आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी केएस भरतला प्लेईंग 11 मध्ये खेळण्याचा मनसुबा राहुल द्रविडने आखला आहे.

IND vs AUS 1st Test Playing 11
Hardik Pandya Test : हार्दिक पांड्या आता कसोटी संघात परतणार; काय म्हणाला कर्णधार?

दुसरीकडे वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर वेगवान माऱ्याची धुरा मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या खांद्यावर आहे. याचबरोबर फिरकी विभागात रविंद्र जडेजा याच्यासह तीन फिरकी गोलंदाज खेळण्याची शक्यता आहे.

नागपूर कसोटी सामन्यातील भारताची Playing 11

रोहित शर्मा

शुभमन गिल

चेतेश्वर पुजारा

विराट कोहली

केएल राहुल

केएस भरत

आर. अश्विन

रविंद्र जडेजा

कुलदीप यादव

मोहम्मद शमी

मोहम्मद सिराज

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com