
नवी दिल्ली : टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक विजेती बॉक्सर लवलीनाने भारतीय बॉक्सिंग महासंघाचे कार्यकारी संचालक कर्नल अरुण मलिक यांच्यावर ‘अपमानास्पद आणि लैंगिक भेदभाव करणारे वर्तन’ केल्याचा आरोप केला असून, या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. लवकरच चौकशी अहवाल सादर होणार असल्याची माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने दिली.