माईक टायसनची विमानातच 'ठोसेबाजी'; पोलीस तपास सुरू | Boxer Mike Tyson Repeated Punch first-class co passenger | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boxer Mike Tyson Repeated Punch first-class co passenger

माईक टायसनची विमानातच 'ठोसेबाजी'; पोलीस तपास सुरू

जगविख्यात हेविवेट बॉक्सिंग चॅम्पियन (Boxer) माईक टायसन (Mike Tyson) याने सॅन फ्रेसिस्को आंतरराष्ट्री विमानतळावरून उड्डाण केलेल्या विमानातील एका सह प्रवाशाला ठोसा मारला. टायसन याच्या ठोसेबाजीचा हा व्हिडिओ व्हायरल (Mike Tyson Punch Video) होऊ लागल्यानंतर आता संबंधित तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ठोसेबाजीची ही घटना गुरूवारी घडली. या व्हिडिओत माईक टायसन आपल्या पाठीमागे बसलेल्या प्रवाशाला मारहाण करताना दिसत आहे. टायसनने या अनोळखी व्यक्तीच्या डोक्यावर सातत्याने ठोसे लगावल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. या बाबातचा व्हिडिओ सर्वात प्रथम टीएमझेड (TMZ) यांनी प्रसिद्ध केला. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार हा व्हिडिओ फ्लोरिडाला जाणाऱ्या जेट ब्लू प्लेनमधील आहे.

हेही वाचा: माझा देश ग्रेट होऊ शकतो, पण....; इरफानच्या ट्विटवर मिश्राचा पलटवार?

टायसन सहप्रवाशाला मारहाण करण्यापूर्वी हा सहप्रवासी टायसनच्या सीटवर उभा राहून जोरात हातवारे करताना दिसत होता. तर टायसन आपल्या सीटवर शांतपणे बसून होता. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात मारामारीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या अधिकृत वक्तव्यानुसार 'अधिकाऱ्यांनी या प्रकरणात सामील असलेल्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. एका व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. त्याने या प्रकरणाची फारशी माहिती दिलेली नाही आणि पोलिसांना सहाकार्य करण्यासही नकार दिला आहे.' दरम्यान दोघा आरोपींना पुढचा तपास होई पर्यंत सध्या सोडून देण्यात आले आहे.

हेही वाचा: मुंबईच्या मेंटॉरचा सल्ला; टी 20 'क्रूर' खेळ, महत्वाच्या क्षणांवर हवे नियंत्रण

याबाबत माईक टायसन यांच्या प्रतिनिधीने असोसिएट प्रेसला एक मेल करून आपली बाजू स्पष्ट केली. या मेलनुसार 'दुर्दैवाने टायसन यांच्यासोबत विमानात एक घटना घडली. त्यांची आणि एका आक्रमक सहप्रवाशाची वादावादी झाली. हा सहप्रवासी टायसन यांना त्रास देत होता. त्याने टायसन यांच्या अंगावर पाण्याची बॉटल फेकली.' दरम्यान विमानातील एका महिला प्रवाशाने देखील टायसन यांनी ठोसे लगावलेला प्रवासी मोठ्याने विमानात बसून आरडा ओरडा करत होता तसेच गैरवर्तणूक देखील करत होता असे सांगितले आहे.

Web Title: Boxer Mike Tyson Repeated Punch First Class Co Passenger Bleeding

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top