esakal | AUSvNZ : 'बॉक्‍सिंग डे' कसोटीत किवीजना हरवत कांगारूंनी मालिकाही जिंकली!

बोलून बातमी शोधा

BoxingDay-AUSvsNZ

- तिसरी कसोटी 2 जानेवारीपासून सिडनीत सुरू होईल.

AUSvNZ : 'बॉक्‍सिंग डे' कसोटीत किवीजना हरवत कांगारूंनी मालिकाही जिंकली!
sakal_logo
By
वृत्तसंस्था

मेलबर्न : 'बॉक्‍सिंग डे' कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 247 धावांनी हरविले. सलामीवीर टॉम ब्लंडेल याने 121 धावा करूनही किवींचा डाव 240 धावांत आटोपला. दुसऱ्या कसोटीतील विजयासह कांगारूंनी तीन लढतींच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

5 बाद 168 वरून चौथ्या दिवशी 4 बाद 137 वरून कांगारूंनी दुसरा डाव 5 बाद 168 धावसंख्येवर घोषित केला. किवींसमोर 488 धावांचे आव्हान होते. पॅट्टीसनने 8 चेंडूंत 3 विकेट घेत हादरे दिले. त्यानंतर लायनने शेपूट गुंडाळले.

कर्णधार केन विल्यमसन भोपळाही फोडू शकला नाही. जेम्स पॅट्टीसन याने त्याला पायचीत केले. सलामीवीर ब्लंडेलने एकाकी झुंज दिली. तो सर्वांत शेवटी बाद झाला. विशेष म्हणजे मॅर्नस लबूशेन याने ही विकेट घेतली. तिसरी कसोटी 2 जानेवारीपासून सिडनीत सुरू होईल. 

- Video : दानिश कनेरिया प्रकरणी शोएब अख्तरने घेतला यू-टर्न!

संक्षिप्त धावफलक :

ऑस्ट्रेलिया : 467 व 5 बाद 168 घोषित (डेव्हिड वॉर्नर 38, ज्यो बर्न्स 35, नील वॅग्नर 50-3) विजयी विरुद्ध न्यूझीलंड : 148 व 71 षटकांत सर्वबाद 240 (टॉम ब्लंडेल 121-210 चेंडू, 15 चौकार, हेन्री निकोल्स 33, बी. जे. वॉटलिंग 22, मिचेल सॅंटनर 27, जेम्स पॅट्टीसन 35-3, 81-4) 

- FlashBack 2019 : क्रिकेटमध्ये दांडी; इतर खेळांमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी!

आम्ही विजयी आघाडी घेतली असली तरी जागतिक कसोटी स्पर्धेमुळे प्रत्येक कसोटी महत्त्वाची आहे. त्यामुळे मालिका जिंकण्याला तेवढे महत्त्व देता येणार नाही. 
- टीम पेन, ऑस्ट्रेलिया कर्णधार 

- हिंदू असल्याने कनेरियावर अन्याय केला असता तर...; मियाँदादची जहरी टीका