किवींचा लिजंड केकेआरचा सहायक प्रशिक्षक

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

आयपीएलमधील शाहरुख खान याची संयुक्त मालकी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्‌लम याची नियुक्ती केली आहे.

कोलकाता- आयपीएलमधील शाहरुख खान याची संयुक्त मालकी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्‌लम याची नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या सायमन कॅटीच याची जागा तो घेईल.

कॅरेबियन प्रीमियर लीगमधील शाहरुखचीच मालकी असलेल्या त्रिनिदाद नाईट रायडर्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही मॅक्‌लमची नियुक्‍ती झाली आहे. तेथेसुद्धा पूर्वी कॅटीचच होता. मॅक्‌लम 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. "केकेआर'शी त्याचे भावपूर्ण नाते आहे. 2008 मधील पहिल्याच मोसमातील पहिल्याच सामन्यात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध 158 धावांची सनसनाटी नाबाद खेळी केली होती. तो पाच मोसम या संघाकडून खेळला. 2009 मध्ये त्याने नेतृत्व सुद्धा केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brendon McCullum set to become KKR assistant coach