
बुटीबोरी : परिसरातील कराटेपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवत ऐतिहासिक कामगिरी बजावली. नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुटीबोरीच्या तब्बल १२ विद्यार्थ्यांनी एकूण १६ पदकाची कमाई करत बुटीबोरीचे महाराष्ट्राचे तसेच भारताचे नाव उज्वल केले.