BYJU'sनं पटकावली फिफा वर्ल्डकप 2022 ची स्पॅन्ससरशीप

ऑनलाईन शिक्षणाबरोबरच आता खेळालाही देणार प्रोत्साहन
BYJU's
BYJU's
Updated on

नवी दिल्ली : भारतीय शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी असलेल्या बायजूजची (BYJU's) कतारमध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपसाठी अधिकृत स्पॉन्सर म्हणून घोषणा करण्यात आली आहे. बंगळुरुस्थित या कंपनीकडून सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पुरवते. ही कंपनी सध्या भारतीय क्रिकेट टीमची स्पॉन्सर आहे पण आता जागतीक फुटबॉलची सॉन्सरशिप हे कंपनीसाठी महत्वाचं पाऊल आहे. (BYJUS announced as Official Sponsor of FIFA World Cup Qatar 2022)

BYJU's
मुंबईचा विचार कायम सोन्याचं अंड देणारी कोंबडी असा केला गेला - उद्धव ठाकरे

फिफा वर्ल्ड कप २०२२ या ट्रेडमार्कसोबत बायजूजचं नाव जोडलं गेल्यानं या कंपनीला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळं कंपनीकडून जे फुटबॉलचे डायहार्ट फॅन्स आहेत त्यांना जोडण्यासाठी अनोख्या पद्धतीनं प्रमोशनही सुरु करण्यात आलं आहे.

BYJU's
बीरभूम हत्याकांडाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल; सुओमोटो दाखल

बायजूजसोबत झालेल्या डीलनंतर फिफाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर के मदाती यांनी म्हटलं की, सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्याचं ध्येय गाठण्यासाठी फुटबॉलचं सामर्थ्य वापरासाठी FIFA समर्पित आहे. BYJU'S सारख्या कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ही कंपनी अनेक समुदायांना जोडून ठेवते आणि जगातील कुठल्याही तरुणांना सक्षम करते, असंही मदाती यांनी म्हटलं आहे.

BYJU's
तीन वर्षात सर्वाधिक सीबीआय चौकशा महाराष्ट्रात; इतर राज्यांची स्थिती काय?

तर बायजूजचे संस्थापक आणि सीईओ बायजू रविंद्रन म्हणाले, "फिफा वर्ल्ड कप कतार २०२२ या सर्वात मोठ्या एकल क्रीडा स्पर्धेची स्पॉन्सरशीप मिळाल्यानं आम्ही अत्यंत उत्साहित आहोत. आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे की, प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधीत्व करायला मिळत आहे. खेळ हा आपल्या जीवनातील मोठा भाग असून जगातील सर्व लोकांना तो एकत्रित आणतो. फुटबॉल ज्याप्रमाणे अब्जावधी लोकांना प्रेरणा देतो, त्याचप्रमाणे आम्ही या भागीदारीतून प्रत्येक मुलाच्या जीवनात शिकण्याची आवड निर्माण करण्याची प्रेरणा देऊ अशी आम्हाला आशा आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com