
CPL : 1-6-6-1-6-4-6-6-6-0-4-4 मसल पावर रसेलची विक्रमी फिफ्टी
Andre Russell Fastest Fifty In CPL : आयपीएलच्या 14 व्या हंगामापूर्वी वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलनं धमाकेदार खेळी केली. त्याने 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. कॅरेबियन प्रिमीयर लीगच्या आतापर्यंतच्या इतिहासातील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. यापूर्वी 2019 मध्ये जेपी ड्युमीने याने 15 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
सेंट लुका किंग्जचा कर्णधार फाफ ड्युप्लेसीसने जमेका थलायवाज विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फोल ठरल्याचे पाहायला मिळाले. आघाडीच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर मध्यफळीतील आंद्रे रसेलनं आपल्यातील मसल पावर दाखवून दिली. त्याने 14 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने नाबाद 50 धावा केल्या. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर जमेका थलायवाजने निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 255 धावा कुटल्या.
Web Title: Caribbean Premier League 2021 Andre Russell Has Just Smashed The Fastest 50 In Cpl History
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..