बेळगाव : विनायकनगर-सिंधी कॉलनी येथे सुरू असेलल्या ‘आयपीएल’वरील सट्ट्याच्या (IPL Betting) जाळ्याचा पर्दाफाश रविवारी झाला. सीईएन पोलिसांच्या (Belgaum Police) विशेष पथकाने येथील अड्ड्यावर छापा घालून दोघांवर गुन्हा नोंदविला आहे. उद्धव जयरामदास रोचलानी (वय ६१) आणि करण यू. रोचलानी (दोघे रा. विनायकनगर, सिंधी कॉलनी, बेळगाव) अशी त्यांची नावे असून, त्यापैकी उद्धव याला पोलिसांनी अटक केली आहे, तर करण हा फरार झाला आहे.