Champions League : टोनी क्रूस, असेनसिओचे गोल; रियल माद्रिद टॉपवर

Toni Kroos
Toni Kroosesakal

टॉनी क्रूस आणि मार्को असेनसिओच्या गोलमुळे रियल माद्रिदने इंटर मिलानचा 2- 0 असा पराभव केला. या विजयासह रियल माद्रिद चॅम्पियन्स लीगच्या ग्रुप डी मध्ये टॉप स्पॉटवर पोहचला आहे. क्रूसने पहिल्या हाफमध्ये गोल करत रियल माद्रिदला खाते उघडून दिले. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये मार्कोने इंटर मिलानच्या गोलपोस्टमध्ये दुसरा गोल दागला. रियल माद्रिदने युरोपीयन हंगामात आतापर्यंत सहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत.

Toni Kroos
Ashes : स्टार्कच्या पहिल्याच चेंडूची झाली इतिहासात नोंद|Video

रियल माद्रिदने ग्रुप स्टेजमध्ये 15 गुण मिळवत ग्रुप डीचे अव्वल स्थान पटकावले आहे. ग्रुप डीमध्ये इंटर मिलान दुसऱ्या स्थानावर आहे. हे दोन्ही संघ राऊंड ऑफ 16 मध्ये पोहचले आहेत. या विजयानंतर रियल माद्रिदचे मॅनेजर अंसेलोट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले 'आम्ही स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली. आता आम्हाला लालिगावर लक्ष केंद्रीत करायला हवे. फेब्रुवारीमध्ये आम्ही या स्पर्धेत काय करु शकतो हे पाहता येईल.'

Toni Kroos
Sports News : हार्दिक पांड्याच्या दुखापतीचे रहस्य कायम

अंसेलोट्टी पुढे म्हणाले की, 'इंटर मिलानला विजयाची गरज होती. पण आम्ही सुरुवातीलाच गोल केला. चेंडूचा ताबा त्यांच्याकडे जास्त होता मात्र ही सामन्य गोष्ट आहे. आम्ही आमची बचावाची रणनिती चांगली आखली होती. दुसऱ्या संघाकडे चेंडूचा ताबा जास्तवेळ असणे ही काही मोठी समस्या नाही. तुम्ही चेंडूचा ताबा मिळवून सामना जिंकू शकत नाही. तुम्हाला जिंकण्यासाठी गोल करावे लागतात.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com