
Chandrahar Patil React on Maharashtra Kesari 2025 : काल अहिल्यानगरमध्ये आयोजित ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तुफान राडा पाहायला मिळाला. वाद इतका टोकाला गेला की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. स्पर्धेतील अंतिम सामना डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पृथ्वीराज मोहोळ यांच्यात खेळवण्यात आला. पंचानी पृथ्वीराज मोहोळच्या बाजूने निकाल दिला, जो शिवराजला मान्य नव्हता. त्यामुळे त्याची पंचांसोबत बाचाबाची झाली. या वादात शिवजाने पंचाला लाथ मारली. या राड्यावर आता महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पंचाला गोळ्या घालायला हव्या होत्या, अशा तिव्र शब्दात संपाप व्यक्त केला आहे.