विजेतेपद जिंकताच चंद्रकांत पंडित यांचे अश्रू अनावर; 23 वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण

कर्णधार म्हणून 23 वर्षांपूर्वी जे नाही करता आले ते प्रशिक्षक बनून करून दाखवलं
chandrakant pandit great memory that had left 23 years back
chandrakant pandit great memory that had left 23 years back

Ranji Trophy 2021-22 Final: प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश क्रिकेट संघाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईचा ६ गडी राखून पराभव केला. मध्य प्रदेशसाठी हे विजेतेपद मिळवणे स्वप्नापेक्षा कमी नाही. विशेषत: संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासाठी हा विजय खुपच खास होता. या विजयासह चंद्रकांत पंडित यांचे अधुरे स्वप्नही पूर्ण झाले.

1999 मध्ये कर्णधार म्हणून साध्य न केलेले लक्ष्य चंद्रकांत पंडित यांनी साध्य केले. 1999 मध्ये जेव्हा मध्य प्रदेशचा संघ पहिल्यांदा रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला होता, त्या वेळी फायनलमध्ये पहिल्या डावात आघाडी घेत मध्य प्रदेश संघाचा पराभव झाला. कर्नाटककडून 96 धावांनी पराभव झाल्याने विजेतेपद जिंकण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. यासह पंडित यांची कारकीर्द संपुष्टात आली होती.

चंद्रकांत पंडित यांनी मध्य प्रदेशचे प्रशिक्षक म्हणून त्या तुटलेल्या स्वप्नांचा पाठला केला आणि आज त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली मध्य प्रदेश संघला रणजी चॅम्पियन बनवले. मध्य प्रदेशच्या संघाने जेतेपद पटकावले तेव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. चंद्रकांत पंडितने नंतर सांगितले की, आज माझ्या संघाने मला 23 वर्षांपूर्वी ज्या मैदानावर मुकले होते त्याच मैदानावर परत आणले आहे.

प्रशिक्षक म्हणून चंद्रकांत पंडित यांच्या कारकीर्दीला 2003 पासून सुरुवात झाली. मुंबईने त्यांच्या नेतृत्वाखाली 2003 मध्ये पहिल्यांदा रणजी करंडक जिंकला होता. त्यानंतर 2004 आणि 2016 मध्येही पंडित यांच्याच प्रशिक्षणात मुंबईने विजेतेपद पटकावले. मुंबईनंतर पंडितने विदर्भाला 2018 आणि 2019 मध्ये दोनदा विजेतेपद मिळवून दिले होते. विदर्भानंतर मध्य प्रदेशला त्याच्या प्रशिक्षकपदाखाली विजेतेपद मिळवण्यात यश आले आहे. मध्य प्रदेशचा हा विजय आणखी खास आहे कारण संघाने पहिल्यांदाच रणजी करंडक जिंकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com