esakal | 'चेल्सी' दुसऱ्यांदा विजेता, मँचेस्टर सिटीचं पुन्हा स्वप्न भंगलं
sakal

बोलून बातमी शोधा

'चेल्सी' दुसऱ्यांदा विजेता, मँचेस्टर सिटीचं पुन्हा स्वप्न भंगलं

'चेल्सी' दुसऱ्यांदा विजेता, मँचेस्टर सिटीचं पुन्हा स्वप्न भंगलं

sakal_logo
By
नामदेव कुंभार

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेवर चेल्सीने दुसऱ्यांदा नाव कोरलं आहे. पुर्तगाल येथे झालेल्या हाय होल्टेज सामन्यात काई होवित्झ याच्या एकमेव गोलच्या बळावर चेल्सीने मँचेस्टर सिटीचा 1-0 च्या फरकानं पराभव केला. मागील हंगामात पॅरिस सेंट जर्मेनकडून चेल्सीचा संघ अंतिम फेरीत पराभूत झाला होता. चेल्सीनं नऊ वर्षांत दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकले. याआधी 212 मध्ये चेल्सीनं चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेवर नाव कोरलं होतं.

चेल्सी आणि मँचेस्टर सिटी दोन्ही संघांनी एकमेंकाना तगडी टक्कर दिली. चेल्सीकडून 42 व्या मिनिटाला काई होवित्झ यानं एकमेव गोल केला. मेसन माउंटच्या पासवर त्याने हा गोल केला.या गोलच्या बळावर चेल्सीनं 2021 मधील चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेवर नाव कोरलं. अंतिम सामन्यातील या पराभवासह पेप गार्डियोला याच्या मँचेस्टर सिटीच्या पहिल्या जेतेपदाचं स्वप्न भंगलं. या पराभवानंतर मँचेस्टर सिटीच्या संघाला सलग दुसऱ्या विजेतेपदाने हुलकावणी दिली.

हेही वाचा: ट्विटरविरोधात गुन्हा; चुकीची माहिती दिल्याचा आरोप

मागील सहा आठवड्यांमध्ये चेल्सीनं मॅनचेस्टर सिटीला तीनवेळा हरवलं आहे. मॅनेजर थॉमस तुशेल यांच्या मार्गदर्शनाखाली चेल्सीच्या हस्ते लीग कप आणि एफए कपमध्ये मँचेस्टर सिटीचा पराभव झाला होता.

loading image