
ईस्ट रदर्फर्ड (अमेरिका): कोल पामरचे दोन गोल आणि त्याने आणखी एका गोलासाठी दिलेला निर्णायक पास यामुळे चेल्सीने युरोपियन विजेत्या पीएसजीचा ३-० असा सहज पराभव करून क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवले. हे तिन्ही गोल पूर्वार्धात करण्यात आले होते.