कोल्हापुरी फुटबॉल चाहते जगात भारी; हा घ्या पुरावा!

इंग्लंडच्या चेल्सी क्लबने केला सन्मान; आंतरराष्ट्रीयस्तरावर दखल
कोल्हापुरी फुटबॉल चाहते जगात भारी; हा घ्या पुरावा!

कोल्हापूर : शाहू स्टेडियमवर इंग्लंडच्या मातब्बर चेल्सी फुटबॉल क्लबचे स्टार खेळाडू इडवार्ड मेन्डी, थियागो सिल्वा, जॉर्जिनो हे प्रशिक्षक तुचेल यांच्यासह जल्लोष करताहेत. हे स्वप्नवत चित्र पाहून धक्का बसला ना. सावरा, हे चित्र थेट चेल्सी क्लबनेच प्रसिद्ध केले आहे, हा दुसरा धक्का. चेल्सा क्लबने देशातील समर्थंक गटातून कोल्हापूरची अव्वल म्हणून निवड केली आहे. संपूर्ण भारतीय फुटबाल क्षेत्रातून यासाठी माहिती मागविली होती. गौरवशाली शतकी पंरपंरा असणाऱ्या कोल्हापुरी फुटबॉलचा सन्मानच या निमित्ताने झाला आहे.

चेल्सी हा इंग्लंडमधील तब्बल 116 वर्षांचा देदीप्यमान इतिहास असणारा मातब्बर संघ आहे. जगातील सर्वात श्रीमंत लिग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्‍लिश प्रीमियर लीगचे सहावेळा तर एफए कपचे आठवेळा अजिंक्यपद पटकाविले आहे. आंतरराष्ट्रीय क्लबस्तरावर प्रतिष्ठेची युएफा चँम्पियन्स लीग, युएफा लीग, युएफा विनर्स कप, यूएफा सुपर कप या स्पर्धांचे प्रत्येकी दोन वेळा विजेतेपद पटाकावून हुकमत राखली आहे. जगभर या क्लबचे समर्थक आहेत. चेल्सी क्लबने या सर्वच समर्थक क्लबची नोंदणी केली आहे.

कोल्हापुरी फुटबॉल चाहते जगात भारी; हा घ्या पुरावा!
IPL 2021 : संजूला 24 लाखाचा दंड; पुन्हा तीच चूक केली तर बॅन

त्यामार्फत विविध फुटबॉलचे उपक्रम राबविले जातात. कोल्हापुरात आठ वर्षांपूर्वी चेल्सी समर्थक गट अस्तित्वात आला. अथर्व शुक्ल, आशिष गुरव, संकेत मगदूम, प्रीतम लिमये, आदित्य होरार आणि सहकाऱ्यांनी अलीकडे या समर्थक गटाचे स्वरूपच पालटून टाकले. क्लबचे सामने विविध ठिकाणी प्रक्षेपित करण्यासह कोल्हापुरी फुटबॉलचे उपक्रम सातत्याने क्लबच्या नजरेस आणले. टर्फवरील स्पर्धा, व्हाँटसॲप ग्रुप या माध्यमातून गटाचे कार्य सुरू आहे. हे सर्वच उपक्रम आणि कोल्हापुरी फुटबॉलची पाशर्वभूमीमुळेच क्लबने दखल घेत सन्मान केला आहे. परदेशातील नामवंत क्लबने कोल्हापुरी फुटबाॅलची घेतलेली दखल अभिमानास्पद आहे.

कोल्हापुरी फुटबॉल चाहते जगात भारी; हा घ्या पुरावा!
IPL Record : मिलरची शिकार करत अश्विनने रचला खास विक्रम

चेल्सीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या स्वप्नवत चित्रात शाहू स्टेडियमवर समर्थंकाच्या गर्दीतील स्टार खेळाडूंच्या जल्लोषाचा हा क्षण लवकरच साकार व्हावा अशीच कोल्हापुरातील प्रत्येक चाहत्यांची इच्छा असणार हे नक्की.

चेल्सी क्लबने देशातील त्यांच्या समर्थक गटामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती मागविली होती. खासकरून कोल्हापुरी फुटबॉलची परंपरा आणि स्पर्धांना मिळणारा प्रतिसाद याचीही त्यांना वेळोवेळी छायाचित्रे, व्हिडिओ पाठविले. ही पार्श्वभूमी आणि येथील गटाच्या उत्कृष्ट कार्यामुळेच हा सन्मान मिळाला आहे.

-अथर्व शुक्ल, सचिव, चेल्सी समर्थक क्लब, कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com