
चेन्नई : भारतामध्ये ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा पार पडणार आहे. चेन्नई येथे या स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होणार होती; मात्र खेळाडू वास्तव्यास असलेल्या हयात रेजेंसी या हॉटेलमध्ये आग लागल्यामुळे ही स्पर्धा एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही स्पर्धा गुरुवारपासून सुरू होणार आहे.