Chess Olympiad 2022: विक्रमी 187 देशांचा सहभाग; भारताचे सर्वाधिक सहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chess Olympiad 2022

Chess Olympiad 2022: विक्रमी 187 देशांचा सहभाग; भारताचे सर्वाधिक सहा

Chess Olympiad 2022 : भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत १८७ देशांचा विक्रमी सहभाग असणार आहे. यात यजमान भारताचे सर्वाधिक सहा संघ खेळणार आहेत. ही स्पर्धा २८ जुलै ते १० ऑगस्टदरम्यान होत आहे.

भारताच्या सहा संघांमधील एकूण ३० भारतीय खेळाडू (तीन खुल्या आणि तीन महिला) यामध्ये सहभागी होतील. प्रत्येक संघात ५ सदस्य असतील, त्यापैकी चार प्रत्येक फेरीत मैदानात उतरवले जातील. ऑलिंपियाड ही ११ फेऱ्यांची स्विस लीग स्पर्धा असेल. ऑलिंपियाडमध्ये यजमान देश दोन संघ मैदानात उतरवू शकतो, परंतु एकूण संघांची संख्या विषम असल्याने भारत दोन्ही श्रेणींमध्ये अतिरिक्त संघ उतरवू शकतो.

हेही वाचा: Video : DK... DK... चा जयघोष करणाऱ्या प्रेक्षकांकडे पाहून मुरली विजयने जोडले हात

तीन भारतीय खुल्या संघांना अनुक्रमे २ रे, ११ वे आणि १७ वे मानांकन आहे. योगायोगाने खुल्या संघातील सर्व १५ खेळाडू ग्रँडमास्टर आहेत. महिला विभागात, भारत- १ संघाला प्रथम; तर भारत- २ आणि भारत- ३ संघांना अनुक्रमे ११ वे आणि १६ वे मानांकन मिळाले आहे. ‘ट्रॉम्सो’, नॉर्वे येथे झालेल्या २०१४ चेस ऑलिंपियाडमध्ये भारताने खुल्या गटात ब्राँझपदक जिंकले होते. २०२० मध्ये कोरोनामुळे आभासी पद्धतीने झालेल्या ऑलिंपियाडमध्ये भारताने संयुक्त सुवर्णपदक जिंकले होते; तर २०२१ च्या आभासी ऑलिंपियाडमध्ये भारताने ब्राँझपदक जिंकले होते.

हेही वाचा: Women's World Cup : BCCI 2025 चा वर्ल्डकप आयोजित करण्यासाठी लावणार जोर

  • भारताचे संघ - पुरुष : भारत १ (२ रे मानांकन)- विदित गुजराथी, पी. हरिकृष्णा, अर्जुन एरिगाईसी, एस. एल. नारायण आणि शशिकरण कृष्णन.

  • भारत २ (११वे मानांकन) : निहाल सरीन, डी. गुकेश, बी. अधिबान, आर. प्रज्ञानंद आणि रौनक साधवानी.

  • भारत ३ (१७ वे मानांकन) : सूर्य शेखर गांगुली, एस. पी. सेतुरामन, अभिजित गुप्ता, कार्तिकेयन मुरली आणि अभिमन्यू पुराणिक.

  • महिला : भारत १ (१ ले मानांकन)- कोनेरू हंपी, डी. हरिका, आर. वैशाली, तानिया सचदेव आणि भक्ती कुलकर्णी.

  • भारत २ (११ वे मानांकन) : वंतिका अग्रवाल, सौम्या स्वामिनाथन, मेरी अॅन गोम्स, पद्मिनी राऊत आणि दिव्या देशमुख.

  • भारत ३ (१६ वे मानांकन) : ईशा करावडे, साहित्य वार्शिनी, प्रत्युषा बोड्डा, नंदीधा पी.व्ही. आणि विश्ववासनावाला.

Web Title: Chess Olympiad 2022 First Ever Chess In India Record 187 Countries Will Participate Sports

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..