Chess : नागपूरचा वैभव आई-वडिलांपासून प्रेरणा घेत बनला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू

नागपूरचा युवा बुद्धिबळपटू वैभव राऊतची सातासमुद्रापार झेप
Chess player Vaibhav Raut became an international player Taking inspiration from his parents nagpur
Chess player Vaibhav Raut became an international player Taking inspiration from his parents nagpursakal

नागपूर - लहानपणी आई-वडिलांना घरी चेसबोर्डवर बुद्धिबळ (Chess) खेळताना पाहून त्यालाही या खेळाचा लळा लागला. खेळ आकर्षक व मजेशीर वाटल्याने त्याने तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी एका प्रशिक्षकाकडे क्लास लावला. कठोर परिश्रम आणि गुरुच्या मेहनतीच्या बळावर त्याने एकेक स्पर्धा गाजवत थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले.

ही कहाणी आहे उपराजधानीतील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू वैभव राऊतची. (Chess player Vaibhav Raut) बजाजनगरमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय वैभवचे वडील प्रा. जयंत राऊत हे वायसीसीई कॉलेजमध्ये प्रोफेसर असून, आई वृषाली नारायणा विद्यालयात शिक्षिका आहे. दोघांनाही बुद्धिबळाची आवड असल्याने ते विरंगुळा म्हणून घरी नियमित चेस खेळायचे. त्यांना चेसबोर्डवर खेळताना पाहून लहानग्या वैभवच्याही मनात या खेळाबद्दल आवड निर्माण झाली. कालांतराने तोदेखील कधी-कधी बुद्धिबळाच्या पटावर हात आजमावायचा. वैभवची दाट इच्छा व कल बघून आई-वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिले. पण बुद्धिबळात प्रगती करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे होते.

Chess player Vaibhav Raut became an international player Taking inspiration from his parents nagpur
Australia : आर्थिक संकटातील श्रीलंकन मुलांसाठी टीम ऑस्ट्रेलिया आली धावून

त्यामुळे आई-वडिलांनी त्या काळातील लोकप्रिय बुद्धिबळ प्रशिक्षक उमेश पाणबुडे यांच्याकडे वैभवला पाठविले. वैभवनेही खेळावर संपूर्ण फोकस करत सकाळ-संध्याकाळ प्रॅक्टिस करून अल्पावधीतच आपली गुणवत्ता सिद्ध केली. स्पर्धा जिंकत गेला तसतसा त्याचा आत्मविश्वास वाढत गेला.

गेल्या १३ वर्षांपासून बुद्धिबळ खेळत असलेल्या वैभवने सुरुवातीला शालेय, जिल्हा व राज्य स्पर्धा गाजवत पुढे राष्ट्रीय व नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. गतवर्षी स्पेनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभवने काही महिन्यांपूर्वी झेक प्रजासत्ताक व सर्बियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून आपली छाप सोडली.

Chess player Vaibhav Raut became an international player Taking inspiration from his parents nagpur
‘मुंबई इंडियन्स’च्या संघातून रशीद, रबाडा खेळणार

याशिवाय या स्पर्धेत त्याने पहिला ‘आयएम’ नॉर्मही मिळविला. नॉर्वेचा जगप्रसिद्ध ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनला आपला आदर्श मानणारा वैभव लवकरच दुबई व अबुधाबीमधील दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये इतिहास घडविण्याची संधी आहे.

ग्रँडमास्टर बनण्याचे स्वप्न

बुद्धिबळात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ग्रँडमास्टर किताब मिळविण्याची प्रत्येक बुद्धिबळपटूची इच्छा असते. वैभवचेही ते स्वप्न आहे. रौनक साधवानी व संकल्प गुप्तानंतर त्याला नागपूरचा तिसरा ग्रँडमास्टर बनायचे आहे. त्या दिशेने त्याची सध्या आगेकूच सुरू आहे. याशिवाय जागतिक रेटिंगमधील २७०० येलो रेटिंग गुणांचा अवघड टप्पा गाठण्याचे व भविष्यात ऑलिम्पियाडमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचेही स्वप्न सध्या २२२० फिडे रेटिंग गुण असलेल्या व सिटी प्रीमियर कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या वैभवने बोलून दाखविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com