Team India : चेतन शर्माच निवड समितीचा खुर्ची सम्राट ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India Selector Chetan Sharma

Team India : चेतन शर्माच निवड समितीचा खुर्ची सम्राट ?

Team India Selector Chetan Sharma : टी-20 विश्वचषक 2022 मधील खराब कामगिरीनंतर चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय निवड समितीने हकालपट्टी केल्याच्या वृत्तांदरम्यान सोमवारी नवीन माहिती समोर येत आहे. चेतन शर्मा यांनी पुन्हा एकदा याच पदासाठी अर्ज केल्याचे सांगण्यात येत आहे. क्रिकेट सल्लागार समिती त्यांना दुसरी टर्म देण्याचा विचार करत आहे. चेतन शर्मासह असे एकूण सात भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांनी सोमवारी सीएसीसमोर मुलाखती दिल्या आहेत.

हेही वाचा: IND vs SL: 360 डिग्री सूर्या घरच्या मैदानावर करणार टोलेबाजी! पण सलामीला कोण खेळणार?

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतरच चेतन शर्माने पुन्हा या पदासाठी अर्ज केल्याचे सांगण्यात येत आहे. अशोक मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) सोमवारी निवडकर्त्यांच्या पदासाठी अर्जदारांच्या मुलाखती घेतल्या. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “चेतन अध्यक्षपदासाठी आवडते आहेत आणि हरविंदर (सिंग) देखील मुलाखतीसाठी हजर झाले होते.

हेही वाचा: IND vs SL Hardik Pandya : कर्णधार पांड्याने सांगितला नव्या वर्षाचा संकल्प; म्हणाला...

माजी सलामीवीर एसएस दास हे पूर्व विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रबळ उमेदवार आहेत तर गुजरातचे मुकुंद परमार पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करू शकतात. यावेळी कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून बीसीसीआय निवडकर्त्यांना केवळ एक वर्षाचा करार देणार असल्याचे कळत आहे. या वेळी विश्वचषकावर लक्ष केंद्रित करून हा एक वर्षाचा करार असेल, असे सूत्राने सांगितले.

श्रीलंकेनंतर मायदेशात होणाऱ्या न्यूझीलंड मालिकेची निवड करण्याची जबाबदारी नव्या निवड समितीची आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20, एकदिवसीय मालिकेच्या निवडीची जबाबदारी चेतन शर्मा अँड कंपनीकडे देण्यात आली होती.