
Chetan Sharma Hardik Pandya : हार्दिक तर माझ्या सोफ्यावर पडून असतो... चेतन शर्मांना हे स्टिंग ऑपरेशन पडणार महागात?
Chetan Sharma Hardik Pandya : भारतीय संघाचे निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा यांचे एक स्टिंग ऑपरेशने सध्या चर्चेत आले आहे. या व्हिडिओमुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. चेतन शर्मा यांनी या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक वादग्रस्त गौप्यस्फोट केला असून त्यामुळे ते चांगलेच गोत्यात आले आहेत.
शर्मांनी विराट - गांगुली वाद, विराट - रोहित वाद आणि हार्दिक पांड्याचा कर्णधार म्हणून उदय यावर अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहे. शर्मांना त्यांची ही वक्तव्ये छुप्या कॅमेऱ्यात कैद होत आहे याची पुसटशी कल्पना नव्हती. आता ही सगळी वक्तव्ये बाहेर आल्यानंतर चेतन शर्मांना तोंड लपवायला देखील जागा उरलेली नाही.
रोहित शर्मा तर माझ्या मुलासारखा
या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मांनी भारतीय कसोटी - वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा आपल्याशी अर्धा अर्धा तास फोनवर बोलत असतो असे वक्तव्य केले. चेतन शर्मा म्हणाले की, 'रोहित शर्मा माझ्या मुलासारखा आहे. निवडसमितीची भुमिका मोठी असते.'
'खेळाडू निवडसमितीच्या संपर्कात राहत असतात. रोहित शर्माने आजच माझ्याशी अर्धा तास फोवर चर्चा केली. हे कोण सिलेक्टर आहे यावर अवलंबून असते. मी वेगळ्या पद्धतीचा व्यक्ती आहे. मी चर्चा झालेली गोष्ट बाहेर सांगत नाही.'
हार्दिक तर माझ्या सोफ्यावर पडून असतो
भारताची टी 20 कर्णधार हार्दिक पांड्याबाबत चेतन शर्मा या व्हिडिओत म्हणतात की हार्दिक माझ्या घरी भेटण्यासाठी येतो. हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेटचे फ्युचर आहे. तो एक खूप नम्र आणि चांगला क्रिकेटपटू आहे. सध्या संघात असलेले काही खेळाडू मला भेटायला येतात. हार्दिकही आला होता. तो इथे सोफ्यावरच पडून होता. दीपक हुड्डा देखील आला होता. उमेश यादव काही दिवसांपूर्वी येऊन गेला. खेळाडूंना बोलायचं असतं.
शर्मा पुढे म्हणाले की, 'हार्दिकने त्या दिवशी दिल्लीत लँड केले मला फोन केला, म्हणाला सर कुठे आहात. मी घरी असल्याचे सांगितले. तो रात्री घरी आला कारण माझ्या घरात जी चर्चा होऊ शकते ती कोठेही होऊ शकत नाही.
हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...