INDvsSA : पहिल्या गियरवरुन थेट चौथा; पुजाराही करु लागला टोलेबाजी

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी उपहारापूर्वी पुजाराने आठ धावा करण्यासाठी तब्बल 62 चेंडू खेळले. मात्र, उपहारानंतर त्याने सरळ चौथा गियर टाकत फटकेबाजी सुरु केली आणि केवळ 13 चेंडूमध्ये 25 धवा केल्या. याचसह त्याने कसोटी कारकिर्दीतील 21वे अर्धशतक पूर्ण केले.

विशाखापट्टणम : पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी उपहारापूर्वी पुजाराने आठ धावा करण्यासाठी तब्बल 62 चेंडू खेळले. मात्र, उपहारानंतर त्याने सरळ चौथा गियर टाकत फटकेबाजी सुरु केली आणि केवळ 13 चेंडूमध्ये 25 धवा केल्या. याचसह त्याने कसोटी कारकिर्दीतील 21वे अर्धशतक पूर्ण केले. 

रोहित शर्मा एका बाजूने फटकेबाजी करत असताना पुजारा मात्र, संथ खेळत होता. तो धावा पळण्यास आळस करत होता. एकदा धाव घेण्यास नकार दिल्यावर रोहितने त्याला शिवीही दिली आणि ती नेमकी माईकमध्ये ऐकू आली. 

त्यानंतर मात्र, त्याने गियर बदलत आछ चौकार आणि एका षटकारासह 106 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheteshwar Pujara scores 21st half century in test cricket