चीनचा एक आदेश... फुटबॉलपटूंनी झाकले स्वतःचे अंग

चीनने टॅटूवाल्या फुटबॉलपटूंवर घातली बंदी, केस रंगवण्यावरही बंदी
Chinese Football Player Tattoo
Chinese Football Player Tattooesakal

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार चीनने (China) आपल्या राष्ट्रीय फुटबॉल संघातील खेळाडूंना एकतर आपले टॅटू (Chinese Football Player Tattoo) हटवावेत नाही तर झाकून ठेवावेत अशी कडक सुचना केली आहे. याबाबतचे आदेश चीनच्या क्रीडा प्रशासनाने दिले आहेत. या आदेशात देशाच्या २० वर्षाखालील आणि युवा गटातील संघात टॅटू काढलेल्या खेळाडूंना घेऊ नये असे स्पष्टपणे म्हटले आहे. याचबरोबर सध्याच्या २३ वर्षाखालील संघातील खेळाडूंना त्यांच्या शरिरावर नवीन टॅटू (Tattoo) काढण्यास बंदी घातली आहे.

Chinese Football Player Tattoo
स्मिथ अडकला लिफ्टमध्ये, लॅम्बुशग्नेचे प्रयत्नही पडले अपुरे

या आदेशात नमुद केले आहे की, '२३ वर्षाखालील राष्ट्रीय संघातील खेळाडूंना नवे टॅटू काढण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याचबरोबर आताचे टॅटू हे खेळाडूंनी स्वतःच हटवावेत अशा सुचनाही दिल्या आहेत. एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत टॅटू हटवता आले नाहीत तरी ते सरावादरम्यान आणि सामन्यादरम्यान दिसणार नाहीत याची काळजी घण्यात यावी असेही या आदेशात म्हटले आहे.

कारण क्रीडा प्रशासनाने (General Administration of Sport of China) या आदेशामागचा उद्देश काय आहे हेही सांगितले. यामुळे चीनच्या फुटबॉल संघाची सकारात्मक प्रतिमा समोर येईल आणि समाजासमोर एक चांगले उदाहरणही ठेवले जाईल असे क्रीडा प्रशासनाने मत आहे.

Chinese Football Player Tattoo
Video: चेतेश्वर पुजारा सर्व दडपण विसरुन थिरकला

याचबरोबर चीनच्या क्रीडा प्रशासनाने संघांसाठी विचारधार आणि राजकीय शिक्षण देण्याचा उपक्रम देखील रावबणार असल्याचे सांगितले. यामुळे खेळाडूंमध्ये देशप्रेमाची भावना प्रबळ होईल. यामुळे ध्येय, जबाबदारी आणि सन्मानाबबातची जाणीव वृद्धिंगत होईल आणि यामुळे राष्ट्रीय संघाला विजय मिळवण्यासाठी, चांगला खेळ करण्यासाठी फायदा होईल असे चीनच्या क्रीडा प्रशासनाला वाटते.

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये टेलिव्हिजनवर टॅटू शो दाखवण्यावर गेल्या ३ वर्षापासून बंदी आहे. आता नुकत्याच क्रीडा प्रशासनाने दिलेल्या आदेशानंतर काही खेळाडूंनी आपले टॅटू हे लाँग स्लिव्ह घालून झाकले आहेत. (Chinese Football Player Tattoo)

चीनने फक्त टॅटूवरच बंदी घातलेली नाही. तर आऊटलेटच्या वृत्तानुसार डिसेंबर २०२० मध्ये महिलांनी केसांना रंग लावला (Hair Dye) होता म्हणून महिलांची विद्यापीठाची फुटबॉल मॅच रद्द करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com