इंडियन आर्मीने 'दणके' दिलेल्या चिनी जवानाच्या हातात ऑलिम्पिक मशाल

China Handed Beijing Winter Olympics Torch to soldier
China Handed Beijing Winter Olympics Torch to soldier esakal

भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद (India China Border Dispute) गेल्या काही वर्षापासून टोकाला पोहचला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ताबा रेषेवर तणावाचे वातावरण आहे. मात्र चीन आपल्या कृतीतून भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतो. आता त्याने बिजिंगमध्ये होणाऱ्या विंटर ऑलिम्पिकमध्ये (2022 Winter Olympics) भारत - चीन तणाव हायलाईट करण्याचा प्रयत्न केला.

चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने पीपल्स लिबरेशन आर्मीचे रेजिमेट कमांडर क्यूई फैबाओ यांच्याकडे विंटर ऑलिम्पिकची (Beijing Olympics Torch ) मशाल सोपवली. या रेजिमेट कमांडरला गलवानमध्ये (Galwan) भारतीय सैनिकांनी चांगलाच चोप दिला होता. (China Handed Beijing Winter Olympics Torch to soldier Who Beaten by Indian Army in Galwan)

China Handed Beijing Winter Olympics Torch to soldier
Video: 'यश'च्या यशाचा मास्टर माईंड लक्ष्मण

चीन सातत्याने बिजिंग विंटर ऑलिम्पिकमध्ये (Beijing Winter Olympics) राजकारण आणणार नाही असे सातत्याने सांगतो. अमेरिका तसेच अनेक युरोपीय देशांनी चीनच्या मानवाधिकार हक्कांच्या उल्लंघनावरून बिजिंग ऑलिम्पिकवर राजनैतिक बहिष्कार घातला होता. (Beijing Olympics 2022 Boycott) त्यावेळी चीनने विंटर ऑलिम्पिकमध्ये राजकारण आणू नका असा गळा काढला होता. आता खुद्द चीनने विंटर ऑलिम्पिकचा आपल्या राजकीय अजेंडा रेटण्यासाठी वापर करण्यास सुरूवात केली आहे.

China Handed Beijing Winter Olympics Torch to soldier
U 19 WC Semi Final 2 : भारत-ऑस्ट्रेलिया सामना कधी आणि कुठे पाहाल?

भारत आणि चीन दरम्यान, लडाख बरोबरच अनेक ठिकाणी सीमा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण आहे. आतापर्यंत हा वाद सोडवण्यासाठी चर्चेच्या १४ फेऱ्या झाल्या आहेत. मात्र अजून कोणताच तोडगा निघालेला नाही. दोन्ही देशांनी त्यांच्यामधील वादात तिसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप मान्य नसल्याचे सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com