SATWIK-CHIRAG REACH CHINA MASTERS SEMIFINAL: चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय जोडीने पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी किम ॲस्ट्रप-अँडर्स रासमुसेन जोडीचा तीन गेममध्ये पराभव केला.
शेनझेन (चीन) : सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय जोडीने चीन मास्टर्स या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली; मात्र पुरुष एकेरीतील किदांबी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आले.