
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदकापासून दूर राहिलेल्या सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या भारतीय जोडीने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ब्राँझपदकाची कमाई केली. याच पार्श्वभूमीवर चिराग शेट्टी याने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदक पटकावता आले नाही. मन दु:खी झाले. वेदना होऊ लागल्या. पॅरिसमध्येच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ब्राँझपदक पटकावता आले. यामुळे साहजिकच आनंद झाला आहे.