Chris Gayle | 'या' साठीच ख्रिस गेलने आधी IPL मग CPL सोडले

Chris Gayle Will Be Playing In New 6ixty T10 Tournament Instead Of IPL and CPL
Chris Gayle Will Be Playing In New 6ixty T10 Tournament Instead Of IPL and CPLESAKAL

वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) या वर्षी होणाऱ्या कॅरेबियन प्रीमियर लीगमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता ख्रिस गेल आयपीएल (IPL) आणि सीपीएल (CPL) या टी 20 स्पर्धा खेळण्याऐवजी नव्या टी 10 क्रिकेट लीग खेळवण्यावर भर देणार आहे. वेस्ट इंडीजमध्ये या वर्षी ऑगस्ट महिन्यात 6ixty नावाची एक टी 10 स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन 24 ते 28 ऑगस्ट यादरम्यान होणार आहे. ख्रिस गेल या नव्या टी 10 लीगचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

Chris Gayle Will Be Playing In New 6ixty T10 Tournament Instead Of IPL and CPL
रोहित शर्मा कसोटी सामन्याला मुकणार; जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व

इएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार गेल म्हणाला की, मी क्रिकेटच्या शॉर्टर फॉर्मेटमध्ये खेळण्यास तयार आहे. याचसाठी मी सीपीएल सुरू होण्यापूर्वीच त्यातून बाहेर पडलो. 'मी 6ixty सारख्या फॉर्मेटमध्ये खेळण्यास उत्सुक आहे. मला पहायचं आहे की ही स्पर्धा कशी खेळली जाते. मी पॉवरप्लेचे तिसरे षटक अनलॉक करण्यासाठीस मिस्ट्री टीम बल आणि पहिल्या 12 चेंडूत दोन षटकार मराण्याची वाट पाहत आहे.' ख्रिस गेल हा सीपीएलमधील एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. त्याने या लीगमध्ये 36.50 च्या सरासरीने 2519 धावा केल्या आहेत. सीपीएलमध्ये लिंडल सिमन्स हा एकमेव फलंदाज आहे ज्याने गेलपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सिमन्सने या लीगमध्ये 2529 धावा केल्या आहेत.

Chris Gayle Will Be Playing In New 6ixty T10 Tournament Instead Of IPL and CPL
''सोना कितना सोना हैं'' म्हणत धनश्री आयर्लंडच्या रस्त्यावरच थिरकली

गेल बरोबरच वेस्ट इंडीजचे अजून काही खेळाडू देखील 6ixty स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. न्यूझीलंड विरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेनंतर वेस्ट इंडीजचे खेळाडू या नव्या लीगमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असतील. वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका 21 ऑगस्ट रोजी संपणार आहे. 42 वर्षाच्या गेलने देखील 2020 मध्ये वैयक्तिक कारण देत सीपीएलमधून माघार घेतली होती. याचबरोबर त्याने 2022 च्या आयपीएल हंगामात बायो बबलमुळे खेळण्यास नकार दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com