खारघर : नवी मुंबईतील खारघर येथे एक कोटी रुपये बक्षीस असलेली गोल्फ कोर्स स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असणार आहे. यामुळे या स्पर्धेला वलय निर्माण झाले आहे..सिडको आणि द प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया यांच्या संयुक्तपणे लार्सन अँड टुब्रोद्वारे सादर केलेल्या पहिल्या सिडको ओपन गोल्फ कोर्स स्पर्धा खारघरमधील गोल्फ कोर्स व्हॅलीमध्ये १६ ते १९ डिसेंबरदरम्यान रंगणार असून या स्पर्धेत एक कोटी रुपयांचे बक्षीस असल्याचे सिडकोचे व्यस्थापकीय संचालक अशोक सिंघल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या स्पर्धेत प्रोफेशनल खेळाडू युवराज संधू, अर्जुन प्रसाद, एन थंगा राजा, जमाल हुसेन, मनू गंडस, अगद चीमा यांसारख्या स्टार खेळाडूंचा सहभाग असणार आहे..Thane News: डोंबिवलीतील क्रीडा संकुलाचा कायापालट होणार! बहुमजली इमारतीसह खेळांसाठी अत्याधुनिक सोयी उपलब्ध होणार .खारघर येथील सिडकोच्या गोल्फ कोर्स व्हॅलीमध्ये प्रथमच गोल्फ कोर्स स्पर्धा रंगणार असून स्पर्धेत १२६ व्यावसायिक खेळाडू सहभागी होणार असून ही स्पर्धा स्ट्रोक-प्ले स्वरूपात खेळवली जाणार आहे. प्रत्येकी १८ होलच्या चार फेऱ्या असणार आहे. दोन फेऱ्यांनंतर त्यातून ५० अव्वल खेळाडू निवडले जाणार आहेत..या स्पर्धेत युवराज संधू, अर्जुन प्रसाद, मनू गंडास, अंगद चीमा, खलिन जोशी आणि ओम प्रकाश चौहान हे आघाडीचे खेळाडू असणार आहे. विशेष म्हणजे, या खेळात नवी मुंबईतील मनोज कुमार, मयूर ठाकूर आणि पंकज ठाकूर आणि मुंबईचा अनिल बजरंग माने याचाही समावेश आहे..१८ होल मैदानावर स्पर्धागोल्फ स्पर्धेविषयी बोलताना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले, सिडको ओपन २०२५ ही आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धा आयोजित करताना आनंद होत असून ही एक आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धा आहे. उदयोन्मुख खेळाडूला प्रोत्साहन देणारी आहे. तसेच सिडकोने तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय गोल्फ मैदानातील १८ होल मैदानावर स्पर्धा रंगणार आहे..ही स्पर्धा जागतिक दर्जाची असून नवीन गोल्फ खेळाडूसाठी हे जागतिक उद्याच्या जागतिक व्यासपीठ प्रदान करणारी आहे. गोल्फ कोर्स स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमास माजी क्रिकेटपटू कपिल देव उपस्थित राहणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिन तेंडुलकर यांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याचे विजय सिंघल यांनी सांगितले..विदेशी खेळाडूही लढणारगोल्फ कोर्स स्पर्धेत श्रीलंकेचे एन. थंगाराजा आणि के. प्रबागरन, बांगलादेशचे जमाल हुसेन, मोहम्मद सिद्दीकुर रहमान, बादल हुसेन, नेपाळचे सुभाष तमांग या विदेश खेळाडूंचा समावेश असणार आहे..Thane News: डोंबिवलीतील क्रीडा संकुलाचा कायापालट होणार! बहुमजली इमारतीसह खेळांसाठी अत्याधुनिक सोयी उपलब्ध होणार .बॉल पिकर कामगार ते गोल्फ प्रशिक्षकमुर्बी गावातील पंकज ठाकूर हे खारघरमधील गोल्फ कोर्समध्ये बॉलपिकर कामगार म्हणून काम करीत होते. आता ते गोल्फ प्रशिक्षक म्हणून काम करीत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी मुंबई, हैदराबाद, बंगळूरमध्ये या खेळाची चुणूक दाखवली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.