Maharashtra Wrestling : खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्यास शासन कटीबद्ध; मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री कुस्ती करंडक स्पर्धेचे उद्घाटन करताना कुस्तीला व्यावसायिक आणि ग्लॅमरस बनवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणण्याची गरज व्यक्त केली.
नागपूर : भारतात कुस्तीची प्राचीन परंपरा राहिली आहे. सध्या कुस्तीचे स्वरूप बदलले आहे. कुस्ती खेळाला अधिक व्यावसायिक आणि ग्लॅमरस बनवण्यासाठी संस्था, फाउंडेशन आणि कॉर्पोरेट क्षेत्राला जोडून घेण्याचा प्रयत्न करू.