
श्रीलंका दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला कोरोनाचे ग्रहण, महत्त्वाचा व्यक्ती पॉझिटीव्ह
श्रीलंका दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. संघाचे हेड कोच अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांना कोरोनाची लागण झाली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचे कोच अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्हा आला आहे. कोच पद मिळाल्यानंतर मॅकडोनाल्ड यांचा श्रीलंका हा पहिलाच दौरा होता.
ऑस्ट्रेलियाने ही माहिती ट्विट करत दिली आहे. मॅकडोनाल्ड यांना क्वारंटाईन ठेवण्यात आलं आहे. तोपर्यंत त्यांची ही धुरा माइकल डि वेनुटो सांभाळणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेवर अर्थिक संकट कोसळलं आहे. तरिही ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यादरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंका टी २० आणि पाच वनडे मॅच खेळणार आहे. यानंतर गॉल येथे टेस्ट मॅच खेळण्यासाठी जानणार आहेत. दोन्ही संघामध्ये पहिली टी २० सात जून ला कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे.
यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी २० वर्ल्ड कप २०२२ चे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा महत्त्वाचा आहे. गतवर्षीचा ऑस्ट्रेलिया संघा चॅम्पियन आहे. त्यांनी गेल्यावर्षी न्यूझीलंडचा पराभव करत पहिला टी २० वर्ल्डकप जिंकला होता.
Web Title: Coach Left Behind With Covid As Aussies Fly Out To Sri Lanka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..