CWG-2022 : महिला क्रिकेट संघ इतिहास रचण्यापासून एक विजय दूर

टी-२० उपांत्य सामन्यात इंग्लंडशी सामना
IND VS ENG
IND VS ENG

बर्मिंगहॅम : पाकिस्तान आणि बर्बाडोस यांच्याविरुद्ध दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाचा उद्या बलाढ्य इंग्लंडबरोबर राष्ट्रकुल महिला ट्वेन्टी-२० स्पर्धेत उपांत्य फेरीत सामना होत आहे. ही लढाई हरमनप्रीत कौर संघासाठी सोपी नसेल. गेल्या दोन सामन्यांतील सातत्य ठेवण्याचे आव्हान असेल.

उद्याच्या या सामन्यात इंग्लंडची कप्तान हिथर नाईट दुखापतीने खेळणार नसल्याचा मोठा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो. एजबॅस्टन मैदानावर होणाऱ्या सामन्याला मोठी गर्दी होण्याची शक्यता संयोजक बोलून दाखवत आहेत.

साखळी स्पर्धेतील तीन सामने खेळताना भारतीय संघाने चांगली चमक दाखवली. ऑस्ट्रेलियन संघासमोरचा सामना भारताने गमावला असला, तरी दिलेली तुल्यबळ लढत विश्वास वाढवून गेली. हिथर नाईट खेळणार नसली, तरी इंग्लंडचा संघ कमजोर नाही. गेल्या ३ सामन्यांत भारतीय संघाने धावा केल्या आहेत; पण खरी फलंदाजी पूर्णपणे चमकलेली नाही. एकेरी धावा पळण्यात दिरंगाई झाली आहे. कप्तान हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनाला फटके मारताना घाई करून चालणार नाही. गेल्या सामन्यातील जेमिमा रॉड्रिग्सच्या खेळीने मधल्या फळीत झालेला सकारात्मक बदल भरवसा देत आहे.

अखेरच्या साखळी सामन्यात बार्बाडोसविरुद्ध मोठा विजय मिळवला असला, तरी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना पूर्णतः अपयशी ठरल्या होत्या. आता पदकाच्या शर्यतीत यायचे असेल तर त्यांना धावा कराव्याच लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com