CWG 2022 Day 8 Live :भारताने तीन सुवर्णांसह कुस्तीत पाडला पदकांचा पाऊस! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Commonwealth Games 2022 Birmingham Day 8 Live Update India Medal Tally Schedule Wrestling Badminton

CWG 2022 Day 8 Live :भारताने तीन सुवर्णांसह कुस्तीत पाडला पदकांचा पाऊस!

Commonwealth Games 2022 Birmingham : भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या 8 व्या दिवशी कुस्तीत पदकांचा पाऊस पाडला. भारताच्या साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनियाने सुवर्ण पदक जिंकले. तर पदार्पण करणाऱ्या अंशू मलिकने रौप्य तर दिव्या काकरानने कांस्य पदक पटकावले. भारताने तापर्यंत जिंकलेल्या 25 पदकांमध्ये 9 सुवर्ण 8 रौप्य आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदक तालिकेत पाचव्या स्थानावर आहे. याचबरोबर भारतीय पुरूष लॉन बॉल्स संघाने देखील अंतिम फेरी गाठत आपले रौप्य पदक निश्चित केले आहे.

भारताची पदकसंख्या :

9 सुवर्ण : मीराबाई चानू, जेरेमी लालरिगुंना, अंचिता शेऊली, महिला लॉन बॉल्स संघ, टेबल टेनिस पुरूष संघ, सुधीर ( पॅरा वेट लिफ्टिंग), साक्षी मलिक, बजरंग पुनिया, दीपक पुनिया

8 रौप्य : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशिला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंजू मलिक

8 कांस्य : गुरूराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरभ घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्विन शंकर, दिव्या काकरान

कुस्तीत पदकांचा पाऊस; 9 पदकांसह भारत पाचव्या स्थानावर

भारताने कुस्तीत पदकांचा पाऊस पाडला आहे. अशू मलिकने 57 किलो वजनीगटात रौप्य पदक पटकावत कुस्तीत पदकांचा नारळ फोडला. त्यानंतर पुरूष 65 किलो वजनी गटात बजरंग पुनियाने अपेक्षेप्रमाणे सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर साक्षी मलिकने झुंजार खेळाचे प्रदर्शन करत 4 गुणांची पिछाडी भरून काढत कॅनडाच्या कुस्तीपटूला आसमान दाखवले. कुस्तीत भारताचे हे अवघ्या काही मिनिटातील दुसरे सुवर्ण तर एकूण तिसरे पदक होते. त्यानंतर दीपक पुनियाने पाकिस्तानच्या इमानचा पराभव करत 86 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकालवे. त्यानंतर दिव्या काकरानने देखील 68 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले.

पाकिस्तानच्या इमानला लोळवत दिपकने जिंकले सुवर्ण 

कुस्तीच्या 86 किलो वजनी गटात दीपक पुनियाने पाकिस्तानचा अनुभवी कुस्तीपटू मुहोम्मद इनामचा 3 - 0 असा पराभव करत भारताला कुस्तीतील तिसरे आणि एकूण 9 वे सुवर्ण पदक पटकावून दिले.

कुस्ती : दीपक पुनिया भिडणार पाकिस्तानच्या मोहम्मदशी

राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये आज भारत आणि पाकिस्तान सामना पहावयास मिळणार आहे. भारताच्या दीपक पुनियाने 86 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली आहे. याच प्रकारात पाकिस्ताच्या मोहम्मद इनामने देखील अंतिम फेरी गाठली आहे. या दोघांमध्ये गोल्ड मेडलसाठी लढत होणार आहे. दीपक पुनियाने सेमी फायनलमध्ये अॅलेक्स मूरीवर 3 - 1 असा विजय मिळवला होता. यापूर्वी दीपकने आज आपले पहिले दोनही सामना तांत्रिक सरसतेवर जिंकले होते.

कुस्ती : दीपक पुनिया, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने पदक केले निश्चित

साक्षी मलिक, बजरंग पुनिया, दीपक पुनिया यांनी आपापल्या वजनी गटात अंतिम फेरी गाठत पदक निश्चित केले.

 कुस्ती : मोहित ग्रेवाल सेमी फायनलमध्ये

भारताचा 125 किलो वजनी फ्रिस्टाईल प्रकारात खेळणाऱ्या भारताच्या मोहित ग्रेवालने अलेक्सियसचा 10 - 1 असा पराभव करत सेमी फायनल गाठली.

कुस्ती : अंशू मलिक, साक्षी मलिकचा सेमी फायनलमध्ये प्रवेश

कुस्तीत महिला 57 किलो फ्रिस्टाईल प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या सिमोनिडीसचा 10 - 0 असा पराभव करत सेमी फायनल गाठली. तर 62 किलो वजनीगटात साक्षी मलिकने इग्लंडच्या केलसी बार्नेसचा 10 - 0 असा पराभव करत सेमी फायलनमध्ये प्रवेश केला.

पॅरा टेबल टेनिस : 

भारताची महिला पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलने महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.

अॅथलेटिक्स : 

पुरूष 4 बाय 400 मीटर रिले स्पर्धेत भारताच्या मोहम्मद अनास याहिया, नोह निरमन टॉम, मोहम्मद अजमल वैरविथोडी आणि अमोज जेकब यांनी 3 मिनिटे 6.97 सेकंदात शर्यत पूर्ण करत आपल्या ग्रुपमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे ते 7 ऑगस्टला होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र झाले आहे.

कुस्ती : 86 किलो वजनी गट

भारताच्या दीपक पुनियाने 86 किलो वजनीगटाच्या आपल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या मॅथ्यू ऑक्झेनहमचा 10 - 0 असा पराभव करत पुढची फेरी गाठली.

कुस्ती : 65 किलो वजनी गट

65 किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियाची विजय सलामी. बजरंग पुनियाने नेरूच्या लुई बेंगहमचा 4 - 0 असा पराभव केला.

राष्ट्रकुल स्पर्धेतील आजचे शेड्युल..