वेटलिफ्टींग मध्ये पदकांचा धडाका कायम; लवप्रीत सिंगने जिंकले कांस्यपदक : Lovepreet Singh wins bronze medal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lovepreet Singh wins bronze medal

वेटलिफ्टींग मध्ये पदकांचा धडाका कायम; लवप्रीत सिंगने जिंकले कांस्यपदक

Lovepreet Singh wins bronze Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशीही वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय लवप्रीत सिंह पुरूष 109 किलो ग्राम वजनी गटात देशासाठी कांस्यपदक पटकावले आहे. लवप्रीतने स्नॅचमध्ये 163 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 192 किलो असं एकूण 355 किलो वजन उचलून कांस्यपदकावर कब्जा केला. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला नववे पदक मिळाले आहे. लवप्रीतच्या यशस्वी कामगिरीनंतर भारताची राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील पदकसंख्या चौदावर पोहचलीय.

लवप्रीत सिंहने वेटलिफ्टिंगच्या 109 किलो ग्राम वजनी गटात चांगली कामगिरी केली. स्नेचमध्ये पहिल्या प्रयत्नात त्याने 157 किलो वजन उचललं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 161 आणि तिसऱ्या प्रयत्नात 163 किलो वजन उचललं. तसेच क्लीन अँड जर्कमधील पहिल्या प्रयत्नात 185 किलो ग्राम वजन उचललं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 189 आणि तिसऱ्या प्रयत्नात 192 किलोग्राम उजन उचललं.

राष्ट्रकुल 2022 मध्ये भारताने आतापर्यंत 14 पदके जिंकली आहेत. सर्वाधिक पदक वेटलिफ्टिंगमध्ये आली आहे. मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली सुवर्णपदक वेटलिफ्टिंग. महिला लॉन बॉल संघ आणि टेबल टेनिस पुरुष संघने सुवर्णपदक पटकावले आहे. सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ यांनी पाच रौप्य जिंकली आहे. गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह यांनी कांस्यपदक पटकावले आहे.

Web Title: Commonwealth Games Weightlifter Lovepreet Singh Wins Bronze Medal 109 Kg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..