CWG2022 INDW vs PAKW : स्मृतीचा धडाका; राष्ट्रकुलमध्ये पाकचा पराभव

Commonwealth Games Womens Cricket Competition 2022 India Women vs Pakistan Women 5th Match Group A
Commonwealth Games Womens Cricket Competition 2022 India Women vs Pakistan Women 5th Match Group Aesakal

Commonwealth Games INDW vs PAKW Live : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा आठ विकेट्सनी पराभव करत आपला पहिला विजय साजरा केला. भारताने पाकिस्तानचे 100 धावांचे माफक आव्हान 12 व्या षटकात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून स्मृती मानधनाने 42 चेंडूत नाबाद 63 धावांची आक्रमक खेळी केली. तर गोलंदाजीत स्नेह राणा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

स्मृतीच्या चौकाराने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब

स्मृती मानधनाने नाबाद 63 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. तिने चौकार मारत सामना संपवला.

94-2 : भारताला दुसरा धक्का 

विजयासाठी 6 धावांची गरज असताना मेघनाला ओमैमा सोहैलने 14 धावांवर बाद केले.

स्मृती मानधनचा झंजावात

स्मृती मानधनाने आक्रमक फलंदाजी करत 31 चेंडूत आपले अर्धशतक ठोकत भारताला विजयी मार्गावर नेले. तिने तुबाला षटकार मारत आपले अर्धशतक दणक्यात साजरे केल.

61-1 : शेफाली परतली, स्मृतीची धडाकेबाज फलंदाजी

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने भारतसमोर विजयसाठी 100 धावांचे आव्हान ठवले. हे आव्हान पार करताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी 61 धावांची सलामी दिली. यात स्मृती मानधनाचा 44 धावांचा तर शेफाली वर्माचा 16 धावांचे योगदान होते.

99-10 : शेवटच्या षटकात राधा यादवची कमाल पाकिस्तानचा संघ 99 धावात ढेर

राधा यादवने शेवटच्या 18 व्या षटकात 3 धावा देत दोन विकेट घेतल्या. तसेच एक फलंदाज धावबादही झाली. त्यामुळे पाकिस्तानचा संघ 99 धावात ढेर झाला. भारतासमोर आता विजयासाठी 18 षटकात शंभर धावांची गरज आहे.

96-7 : शेफालीच्या षटकात दोन विकेट

सामन्याचे 17 वे षटक टाकणाऱ्या शेफाली वर्माच्या षटकात दोन विकेट पडल्या. आलिया रियाझ 18 धावांवर धावबाद झाली. त्यानंतर सहाव्या चेंडूवर कैनात इम्तियाज देखील भोपळाही न फोडता माघारी गेली.

80-5 : पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी

पाकिस्तानची फलंदाज ओमैमा सोहैल 10 धावांची भर घालून धावबाद झाली.

64-4 : रेणुका सिंह ठाकूरचा पाकला चौथा धक्का

वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूरने पाकिस्तानला चौथा धक्का दिला. तिने आयेशा नसीमला 10 धावांवर बाद केले. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था 11.3 षटकात 4 बाद 64 धावा अशी झाली.

51-3 : स्नेह राणाच्या फिरकीत पाक फसले

भारताची फिरकीपटू स्नेह राणाने एकाच षटकात दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचणाऱ्या मारूफ आणि मुनिबाला बाद करत पाकिस्तानला मोठा धक्का दिला. कर्णधार मारूफ आठव्या षटताच्या तिसऱ्या चेंडूवर 17 धावा करून तर मुनिबा अली पाचव्या चेंडूवर 30 चेंडूत 32 धावा करून बाद झाली.

50/1 (8.2) : मारूफ - मुनिबा अलीची अर्धशतकी भागीदारी

पाकिस्तानची कर्णधार मारूफ आणि मुनिबा अलीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. त्यात आक्रमक फलंदाजी करणाऱ्या मुनिबा अलीचा वाटा मोठा होता.

5 overs PAKW 26-1 

भारतीय गोलंदाजांची चांगली सुरूवात. पाकिस्तानच्या 5 षटकात 1 बाद 26 धावा

0-1 : पाकिस्तानला पहिला धक्का

भारताच्या मेघना सिंहने पाकिस्तानला पहिला धक्का दिला. तिने इराम जावेदला शुन्यावर बाद केले.

पावसामुळे सामन्याची षटके केली कमी 

राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघातील सामन्यात दोन वेळा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामन्याची षटके कमी करून आता सामना प्रत्येकी 18 षटकांचा करण्यात आला आहे.

पुन्हा पावसाचा व्यत्यय

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपल्या संघात दोन बदल केले. मात्र सामना सुरू होण्यापूर्वीच पुन्हा पावसाला सुरूवात झाली.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकली

पाकिस्तानची कर्णधार बिसमा माहरूफने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सामन्यात पावसाचा व्यत्यय, नाणेफेकीस उशीर 

भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाने आपला खेळ सुरू केल्याने नाणेफेकीस उशीर झाला.

Commonwealth Games INDW vs PAKW Live : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा आठ विकेट्सनी पराभव करत आपला पहिला विजय साजरा केला. भारताने पाकिस्तानचे 100 धावांचे माफक आव्हान 12 व्या षटकात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून स्मृती मानधनाने 42 चेंडूत नाबाद 63 धावांची आक्रमक खेळी केली. तर गोलंदाजीत स्नेह राणा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com