
लंडन : भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळवली तेव्हा त्याचे नाव पतौडी ट्रॉफी ठेवले होते. दोन्ही क्रिकेट मंडळांनी तेच नाव बदलून आता तेंडुलकर-अँडरसन करायचे ठरवल्यावरून बरीच उलटसुलट चर्चा चालू आहे. जुन्या जाणत्या खेळाडूंमध्ये मन्सूरअली खान पतौडी यांचे नांव हटवण्यावरून अपेक्षेप्रमाणे नाराजी आहे. दुसऱ्या बाजूला काही काळानंतर नांव बदलून नव्या माजी महान खेळाडूंचे नाव का दिले जाऊ नये, असा एक मतप्रवाह आहे.