esakal | Copa America : ब्राझीलची मदार नेमारवर; सिल्वाचं कमबॅक
sakal

बोलून बातमी शोधा

Brazil Team

Copa America : ब्राझीलची मदार नेमारवर; सिल्वाचं कमबॅक

sakal_logo
By
सुशांत जाधव

Copa America Football : स्टार स्ट्रायकर नेमार कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलच्या आक्रमणाची धूरा सांभाळणार आहे. ​अनुभवी डिफेंडर थिएगो सिल्वा दुखापतीमूळे सध्या फुटबॉलपासून दूर असूनही त्याला ब्राझीलच्या संघात स्थान देण्यात आले आहेत. ब्राझीलचे कोच टि​टे यांनी बुधवारी कोपा स्पर्धेसाठी 24 सदस्यीय संघाची घोषणा केली. रविवारी 13 जूनपासून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ब्राझील या स्पर्धेची मेजवाणी करणार आहे. अर्जेंटिना आणि कोलंबियाने संयुक्तपणे यजमानपदातून माघार घेतल्यानंतर ब्राझीलला यजमानपद मिळाले होते. (copa america football neymar thiago silva included in brazil squad)

दक्षिण अमेरिकेतील विश्व कप क्वालिफायिंग स्पर्धेसाठी संघात स्थान देण्यात आलेल्या बहुतांश खेळाडूंची कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चेल्सीचा डिफेंडर थिएगो सिल्वा याचे संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी उत्सुकता नेमारने बोलून दाखवली होती. कोपा अमेरिका स्पर्धेत नियुक्ती झाल्यानंतर दोन्ही स्पर्धेत खेळण्याची शक्यता धूसर झालीये. 13 जून ते 10 जूलै कोपा अमेरिका स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

हेही वाचा: SL vs IND : गब्बरच कॅप्टन, पुणेकर ऋतूराजलाही मिळाली संधी

ब्राझीलचा संघ : गोलकिपर: एलिसन (लिवरपूल), एडर्सन (मँचेस्टर सिटी), वेवर्टन (पाल्मेरास)

डिफेंडर : इमर्सन (बार्सिलोना), डॅनिलो, एलेक्स सँड्रो (युवेंटस), रेनान लोदी, फेलिप (एटलेटिको मॅड्रिड), एडर मिलिटाओ (रियल मॅद्रिद), मार्क्विनहोस (पेरिस सेंट-जर्मेन), थिएगो सिल्वा (चेल्सी).

मिडफिल्डर : कॅसीमिरो (रियल मॅद्रिद), डगलस लुइज (एस्टन विला), एवर्टन रिबेरो (फ्लॅमेंगो), फॅबिन्हो (लिवरपूल), फ्रेड (मॅचेस्टर यूनाइटेड), लुकास पाक्वेटा (ल्यों).

फॉरवर्ड: एवर्टन (बेनफिका), रॉबर्टो फिरमिनो (लिवरपूल), गेब्रियल बारबोसा (फ्लेमेंगो), गेब्रियल जीसस (मँचेस्टर सिटी), नेमार (पॅरिस सेंट-जर्मेन), रिचर्डसन (एवर्टन), विनीसियस जूनियर (रीयाल मॅद्रिद).