AUS vs WI : कोविड-19 पॉझिटिव्ह तरीही खेळाडू उतरला क्रिकेटच्या मैदानात, कशी मिळाली परवानगी? जाणून घ्या नियम

COVID-positive Cameron Green takes field in AUS vs WI 2nd
COVID-positive Cameron Green takes field in AUS vs WI 2nd

AUS vs WI 2nd Test : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना द गाबा येथे खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला कोविड-19 ची लागण झाली होती. तो पहिली कसोटी खेळणार नाही असे वाटत होते. पण जेव्हा ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हन घोषणा केली, तेव्हा त्यात त्याचे नाव संघात होते.

COVID-positive Cameron Green takes field in AUS vs WI 2nd
IND vs ENG : इंग्लंड तो गयो... 3 फिरकीपटू अन् 2 धाकड गोलंदाज! जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

खरं तर, ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाने कॅमेरून ग्रीनला कोविड-19 ची लागण असूनही खेळण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रगीत सुरू असताना कॅमेरून ग्रीन आपल्या संघापासून थोडा लांब उभा होता. ज्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्रीनपासून लांब राहण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून त्याला कोविडची लागण होऊ नये.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कोरोना संक्रमित खेळाडूंना काही नियमांचे पालन करून सामन्यात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.

जाणून घ्या नियम

  • या सामन्यात ग्रीनला आयसीसीने बनवलेले नियम पाळावे लागतील. त्याला संपूर्ण सामन्यात खेळाडूपासून अंतराची काळजी घ्यावी लागेल.

  • तो फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतो, परंतु चेंडूवर घाम लावता येणार नाही.

  • जेव्हा जेव्हा चेंडू त्यांच्याकडे जाईल तेव्हा तो सेनिटाइज केला जाईल.

  • त्याचप्रमाणे तो सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडूशी हस्तांदोलन करणार नाही. आणि खेळाडूंकडे जाऊन विकेट घेतल्याचा आनंद साजरा करू शकणार नाही.

दुसऱ्या कसोटीतील दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), तेजनारिन चंदरपॉल, किर्क मॅकेन्झी, अॅलिक अथांजे, क्वाम हॉज, जस्टिन ग्रीव्हज, जोशुआ दा सिल्वा, केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, शामर जोसेफ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com