स्मिथला चेंडू लागल्याने लागू होणार 'हा' नवा कठोर नियम

Cricket Australia to start with a new rule after steve smith got hurt
Cricket Australia to start with a new rule after steve smith got hurt

लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा तेजतर्रार बाँउन्सर लागल्याने ऑस्ट्रेलियाचा फलंदजा स्टिव्ह स्मिथ जखमी झाला होता. त्यानंतर त्याला मैदान सोडून जावे लागले होते. भविष्यात अशी दुखापत कोणत्याही खेळाडूला होऊ नये म्हणून  आता नवा नियम लागू करणार आहे. 

ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटूंच्या सुरक्षेसाठी आता मानेची सुरक्षिततवाला हेल्मेट वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युज याच्या मृत्यूनंतर मैदानावर खेळाडूंच्या सुरक्षतेवर भर देण्यात आला. 2014मध्ये शैफील्ड शिल्ड सामन्यादरम्यान ह्युजच्या डोक्याला चेंडू लागून त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं पर्यायी खेळाडूचा नियम लागू केला. आता हा नियम आयसीसीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरण्यात येत आहे.

आता स्टेम गार्ड्सचा होणार वापर

ह्जूजच्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेलियामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मानेच्या सुरक्षेसाठी स्टेम गार्ड वापरण्यात आला. मात्र त्याची सक्ती करण्यात न आल्यामुळे अशेस मालिकेत स्टीव्ह स्मिथ हेड गार्ड न वापरता मैदानात उतरला. त्यामुळे आता स्टेम गार्डचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे विज्ञान खेळ आणि चिकित्सा प्रमुख अलेक्स कोंटोरिस एक वर्ष याचा वापर करून पाहणार आहे. त्यानंतर या हेल्मेटची सक्ती करण्यात येईल. आयसीसीही याचा वापर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com